ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाची परिस्थिती बघून देखील भाजपच्या काळ्या काळजाला पाझर फुटला नाही : आ. गोरंट्याल

December 4, 202016:27 PM 104 0 0

जालना (प्रतिनिधी) शेतकर्‍याच्या देशव्यापी आंदोलनाची भयावह परिस्थिती बघून संपुर्ण देश हळहळ व्यक्त करतांना दिसत आहे. परंतूकेंद्रातील भाजप सरकारच्या काळ्या काळजाला पाझर फुटला नाही. सरकारच्या या निर्दयी आणि आडेलतट्टूपणा देशवाशियांनी बघीतला आहे. देश केंद्र सरकारला माफ करणार नाही. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या तात्काळ मजुर केल्या नाही तर आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे. दिल्ली येथे शेतकर्‍यांचे देशव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोला पाठींबा म्हणुन जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीन शुक्रवार रोजी जुना जालना गांधीचमन येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी आ. कैलास गोरंट्याल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला केंद्र सरकाच्या माध्यमातून विविध पध्दतीने अनेक ठिकाणी बाधा आणण्यात आली. दिल्लीकडे कुच करणार्‍या शेतकर्‍यांना अडविण्यासाठी पाण्याचा वर्षाव आणि अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. ऐवढा अन्याय सहन करुन शेतकर्‍यांनी अखेर दिल्ली गाठली. सहा दिवस उलटून ही केंद्र सरकार आपला निर्णय जाहीर करत नाही ही अंत्यत दुर्दैवी बाब असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.

यावेळी आ. राजेश राठोड म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी जालना जिल्हातील शेतकरी दिल्लीकडे कूच करेल यासाठी काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांना पुर्ण सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे. पोलिसाकरवी शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाचा आ. राठेड यांनी निषेध व्यक्त करत शेतकर्‍यांच्या मागण्या तात्काळ केंद्र सरकारने मान्य कराव्यात नसता याचे भयकंर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा ईशारा त्यांनी यावेळी दिला. अ. भा. काँग्रेस सदस्य भिमराव डोंगरे यांनी सांगीतले की, केंद्र सरकाने शेतकर्‍यांविरूद्ध केलेले तीन काळे कायदे म्हणजे शेतकर्‍यांना संपुर्णपणे उध्वस्त करण्याचा डाव आहे. परंतू काँग्रेस पक्ष भाजपच्या कुटील डावाला हानून पाडल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्‍यांना पाठींबा म्हणुन कॉग्रेस पक्षाचे राज्यस्तरावर धरणे आंदोलने केली जात आहे. परंतु या पुढे काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख करतांना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकर्‍यांविरूद्ध केलेले कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या पुर्वी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहे. आज शेतकर्‍यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हातील काँग्रेसने धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. त्यांनी यावेळी शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रदेश कॉग्रेसचे सचिव विजय कामड, आर. आर. खडके, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद, तालुध्यक्ष वसंत जाधव, महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, नंदा पवार, राम सावंत, अ‍ॅड. विनायकराव चिटणीस, गुरुमितसिंग सेना, चंदाताई भागडीया, धरमा खिलारे, अ‍ॅड. संजय खडके, अरुण घडलिंग, समाधन शेजुळ, गणेश खरात, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, युवराज राठोड, नगरसेवक आरेफ खान, शेख शकील, सय्यद अजहर, किशोर गरदास, संजय भगत, अ‍ॅड. कामरान खान, दत्ता शिंदे, नारायण वाडेकर, राजु पवार, अंकुश गायकवाड, शिवराज जाधव, वैभव उगले, रविकांत जगधने, गजानन खरात, मनोहर उघडे, अंजाभाऊ चव्हाण, बाळासाहेब सिरसाठ, जॉर्ज उगले, सुरेश बोर्डे, रहीम तांबोळी, गोपाल चित्राल, धमेश निकम, विनोद पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले तर जालना तालुध्यक्ष वसंत जाधव यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *