जालना (प्रतिनिधी) :-जालना शहरातील कदीम जालना हद्दीमधील कैकाडी मोहल्ला या भागातील अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बऱ्याच महिलांवर पोलीसांकडून केसेस करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक महिला चंद्रकला रामलाल जाधव या महिलेवर जास्त केसेस व तिच्यावरती वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा तिचे हात भट्टी बनवण्याचे व विक्रीचे काम सुरूच असल्या कारणाने मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या कडे तिच्याबद्दल स्थानबद्धतीचा प्रस्ताव पाठवला होता, सदरचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर तो मंजुरीसाठी मुंबई येथे मंत्रालयात पाठवण्यात आलेला होता. तो प्रस्ताव मंत्रालयातून मंजूर होऊन आलेला आहे. त्यामुळे सदर महिलेची स्थानबद्धता मंजुरी हे आल्याने कन्फर्म झालेली आहे.
सदर बाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दि. 7 डिसेंम्बर रोजी कलम 3 पोटकलम (1)महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड ,हातभट्टीवाले,औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार,धोकादायक व्यक्ती,हकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करण्या-या व्यक्ती विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबत अधिनिय 1981 अन्वये सदर महिलेस स्थानबध्द करण्याचे आदेश काढल्याने स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
तसेच या पुढे कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55,56,57 व एमपीडीए प्रमाणे मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात येणार आहे. आशा प्रकारे अवैध धंदे करणाऱ्यास चेतावनी आहे की,यापुढे अवैद्य धंदे चालू देणार नाही, असे धंदे करणार्यांनी चांगले जीवन जगावे असेही यावेळी पो.निरि. महाजन यांनी अवाहन केले.
Leave a Reply