ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला 27 फेब्रुवारी रोजी पोलिओ लसीची मात्रा अवश्य द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

February 25, 202213:50 PM 40 0 0

जालना :- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यासाठी दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या बालकाला नजिकच्या पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लसीची मात्रा अवश्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात सन 1995 पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येतो. गेल्या 26 वर्षापासुन सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे 13 फेब्रुवारी, 2011 नंतर एकही पोलिओचा रुग्ण आढळुन आलेला नाही. भारताला पोलिओ निर्मूलनाचे 27 मार्च, 2017 रोजी प्रमाणपत्र मिळालेले असले तरी शेजारील देशाचा पोलिओचा धोका लक्षात घेता ही मोहिम राबविण्यात येत आहे.
रविवार दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी जालना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 2 लाख 51 हजार 437 बालकांना लस देण्यासाठी 1 हजार 730 बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. यामध्ये शहरी भागात 255 बुथ तर ग्रामीण भागामध्ये 1 हजार 475 बुथ असणार आहेत. 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला लस टोचली जावी यासाठी 4 हजार 694 एवढे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पर्यवेक्षणाकरिता 347 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यासाठी 3 लाख 88 हजार एवढ्या लसीची मात्राही उपलब्ध करुन ठेवण्यात आलेली असुन 55 शितसाखळी केंद्राच्या माध्यमातुन लसीचा पर्याप्त साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
विटभट्टया, खडीकेंद्र, ऊसतोड कामगार, वाड्या अशा ठिकाणी असणारे जे पालक 0 ते 5 वयोगटातील बालकांना बुथवर लस पाजण्यासाठी घेऊन जाऊ शकत नाहीत अशांसाठी एकुण 125 मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वेस्टेशन, टोलनाका अशा ठिकाणी 168 ट्राझिट टीमही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासुन वंचित राहू नये यासाठी 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत हिरिरीने सहभाग नोंदवुन बालकांना लसीची मात्रा अवश्य द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *