ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रत्येक गावकऱ्याने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा: जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांचे आवाहन

August 11, 202214:14 PM 14 0 0

जालना :- देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.  प्रत्येक देशाच्या विकासरुपी पक्षाची महिला व पुरुष हे दोन पंख आहेत. विकासाची गरुड भरारी अधिक मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. “घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत प्रत्येकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन तिरंग्याच्या संहितेचे पालन करत प्रत्येक गावकऱ्याने दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत पीरकल्याण गावात ज्ञानदीप महिला ग्रामसंघ, उज्ज्वल ज्योती ग्रामसंघ, उमेद अभियान यांच्यावतीने बुधवारी रात्री मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना‍ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते.

कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास खिल्लारे, गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी, तालुका व्यवस्थापक गणेश तिडके, राजू राठोड, गिरीश पै, तालुका समन्वयक निलेश शिंदे, सरपंच शरीफा बी नाजीमोद्दीन शेख, उपसरपंच लताबाई बाबासाहेब भुतेकर, पंचायत समिती सदस्य कुशीवर्ताबाई शिंदे, प्रतापराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत हे गौरवशाली पर्व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे करण्यात येत आहे.  घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन याचा प्रत्येकाने अभिमान बाळगत मानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.  तिरंगा फडकवताना त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेत प्रत्येक नागरिकाने तिरंग्याच्या संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असुन जिल्ह्यात सर्वप्रथम मशालफेरीच्या आयोजनातून पीरकल्याण गावाने एकात्मतेचा संदेश दिल्याने सर्व गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी कौतुकही केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.  त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत.    देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी प्रत्येकाच्या मनात रहावी यासाठी भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात प्रत्येकाने सहभाग घेत घरोघरी तिरंगा उपक्रमामध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात प्रकल्प संचालक विलास खिल्लारे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उमेदमार्फत अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  जिल्ह्याच्या तालुक्यातील आठ गावांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभा घेत मशालफेरी आयोजनाबरोबर जिल्ह्यातील 910 गावांमध्ये मशालफेरीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मशालफेरीद्वारे दिला एकात्मतेचा संदेश

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पीरकल्याण येथे ज्ञानदीप महिला ग्रामसंघ, उज्ज्वल ज्योती ग्रामसंघ, उमेद अभियान यांच्यावतीने आयोजित मशालफेरीमध्ये महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनींसह गावकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.  “हरघर तिरंगा”, “घरोघरी तिरंगा”, “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले होते.  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह प्रत्येकाने हातामध्ये मशाल घेत संपुर्ण गावात फिरुन एकात्मतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे संचलन श्री नागरे यांनी केले तर आभार ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *