ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सर्वांनी बुद्ध विचारांचा अंगिकार केला पाहिजे – भदंत पंय्याबोधी थेरो श्रामणेर

September 24, 202112:55 PM 69 0 0

नांदेड – जगाला बुद्धाच्या विचाराची गरज आहे असे म्हटले जाते. तसेच युद्ध नको बुद्ध हवा असेही म्हटले जाते. काही देशांतील आजची परिस्थिती पाहता माणसाला बुद्धाचे विचार किती मार्गदर्शक ठरतात हे प्रत्यक्षरुपाने दिसत आहे. तेव्हा सर्वांनी बुद्ध विचारांचा अंगिकार केला पाहिजे तसेच बुद्ध वाणी सतत श्रवण केली पाहिजे असे आवाहन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी भाद्रपद पौर्णिमेच्या कार्यक्रमात केले. यावेळी भंते चंद्रमणी, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, सुनंद, सुदत्त, शिलभद्र, संघमित्र, सुयश, संघानंद, सारीपुत्र, शाक्यपुत्र, धम्मघोष, शिलानंद यांची उपस्थिती होती.


ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिक्खू संघाच्या भोजनानंतर कार्यक्रमा सुरुवात झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचनेनंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्रिरत्न वंदना, गाथा पठणानंतर धम्मदेसना संपन्न झाली. यावेळी बोलतांना पंय्याबोधी म्हणाले की, आजच्या काळातही धम्मचळवळ थांबता कामा नये. आपल्या वतीने धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच श्रामणेर संस्कृती रुजली तर चळवळ गतिमान होईल. इथे वर्षभरात कधीही श्रामणेर होता येते. याशिवाय धम्मचळवळीचाच एक भाग म्हणून येत्या आश्विन पौर्णिमेला भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. १० आॅक्टोबर पासून या शिबिरास प्रारंभ होत आहे. उपासकांनी मोठ्या प्रमाणावर श्रामणेर दीक्षा घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पौर्णिमेनिमित्त बुद्ध भीम गीत गायन संचाचे कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील पिवळी गिरणी आशिर्वाद नगर येथील प्रियंका ढोले, शांता खंदारे, प्रतिमा खंदारे, शकुंतला आठवले, विद्या साळवे, कुशावर्ता हनवते, माया बुक्तरे, शशीकला पाडमुख, सागरदेवी अवसरे, प्रज्ञा सोनाळे, पुष्पलता मसुरे, रंजना कुपटीकर, वैशाली कांबळे, वासरेबाई, सोनुलेबाई यांच्या धम्मसरिता महिला मंडळाच्या वतीने भोजनदान व आर्थिक दान देण्यात आले. अनेक उपासक उपासिकांनी दान पारमिता केली. प्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, राजरत्न नरवाडे, सूरज नरवाडे, किरण चौदंते, अनुसया नरवाडे, गजभारे, वाघोळे, गौरव चौदंते, पंचशिला गोवंदे, सुदाम लोणेकर, राहुल लोणकर, कपिल बिर्हाडे, सुवर्णा लोणे, जीवन पुंडे, निवृत्ती लोणे, भाटापूरकर, रतन गायकवाड, उमाजी वायवळ यांच्यासह मोत्याचा धानोरा येथील महिला मंडळ, बारड महिला मंडळ, शेंबोली महिला मंडळ, कासारखेडा, पाथरड येथील उपासक उपासिका उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *