ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संविधानाचे प्रत्येकाने वाचन व पालन करावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

November 27, 202113:22 PM 59 0 0

जालना :- संविधान हे स्वतंत्र भारताचा मोठा ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रत्येकाने वाचन व पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संविधान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम विषयक ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. मधुकर गरड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार बहाल केले आहेत. समाजातील प्रत्येकाला आपल्या अधिकाराबद्दल विविध माध्यमाद्वारे माहिती होत असली तरी आपल्या कर्तव्याची जाणिव होणे गरजेचे आहे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारान्वये आपला हक्क तर मागतो परंतु ज्यावेळी कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते त्यावेळी आपल्याला कर्तव्याचा विसर पडतो. आजच्या समाजाला व नव्या पिढीला आपल्या कर्तव्याची जाण होणे आवश्यक असुन त्या प्रमाणात ती पार पाडली जावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविका ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानातील मुल्यांचे प्रत्येकाने पालन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान व सौजण्याची वागणुक मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हुसे यांनी ग्रंथ प्रदर्शनामागची भूमिका विशद करत हे ग्रंथ प्रदर्शन 2 डिसेंबरपर्यंत सकाळी 10.30 ते सायं. 5.30 या वेळेत सर्वांसाठी खुले असुन याचा वाचकप्रेमिंनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामुहिकपणे उद्देशिकेचे वाचन केले. तसेच मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना उपस्थित मान्यवरांनी दोन मिनटे स्तब्धता पाळुन आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास अनिल बावस्कर, ऋषीकेश झुंजकर, वैभव जोशी, रोहित काळे, धीरज पाखरे, शरद हिवाळे, अमोल नाकतोडे, शैलेंद्र बदनापुरकर, नानासाहेब शेरे, भाऊसाहेब पगळ, गणपत चिकटे, के.डी. दांडगे, पी.बी. भोपळे यांच्यासह वाचकप्रेमींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *