ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गतिक संतुलन टिकवीण्यासाठी पर्यटनाला चालना देण्याचा संकल्प सर्वांनी करावा

September 27, 202115:59 PM 36 0 0

जगातील देशांना आर्थिकस्थिती बळकट करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्याची नितांत गरज आहे.पर्यटनाचे महत्व आणि लोकप्रियता पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने १९८० पासुन “२७ सप्टेंबर विश्र्व पर्यटन दिवस” साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.कारण संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९७० ला विश्व पर्यटन संघटनेचा संविधान स्वीकारला होता.जिवनामध्ये खुशी निर्माण व्हावी याकरिता पर्यटनस्थळांना भेट देने गरजेचे असते.पर्यटन फक्त जीवनात खुशीच निर्माण करत नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत असते.आज अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन स्थळांमुळे मजबूत झाल्याचे दिसून येते.भारत पर्यटनासाठी व पर्यटकांसाठी स्वर्ग तर विश्र्व शांतीचा दुत आहे.पर्यटन हे जागतिक प्रदुषण नियंत्रणाचे सुध्दा काम करीत असते.त्यामुळे पर्यटनावर जेवढा जास्त भर दील्या जाईल तेवढेच प्रदुषण कमी होईल व मानवजातीसह, जीवजंतू,वन्यप्राणी, जंगल संपदा यांना जीवदान मिळेल.त्यामुळे पर्यटनाला जास्त महत्व देण्याची गरज आहे.

भारतात २८ राज्ये व ८ केंद्र शासीत प्रदेश आहेत.प्रत्येक राज्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे पहायला मिळतात.आजही लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात व पर्यटनाचा आनंद घेतांना दिसतात.पर्यटस्थळे देशाला सुशोभित करतात व देशाच्या विकासाला हातभार लावण्याचे व चालना देण्याचे काम पर्यटनाच्या माध्यमातून नेहमी होत असते.भारतात लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक नेहमी येत असतात.कारण जगाच्या पाठीवर भारतातील पर्यटनस्थळे ऐतिहासिक व सुशोभित आहे.यामुळे भारताला विदेशी चलन मोठ्या प्रमाणात प्राप्त होते.भारतातील पर्यटनामुळे विदेशी पर्यटकांचे मन मोहून जाते.भारतातील पर्यटकसुध्दा अनेक रम्य ठिकानांणा भेट देऊन आपली उपस्थिती नोंदवीतात.पर्यटनाला चालना मिळावी व रोजगार मिळावा या उद्देशाने २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना घोषणा केली की देशातील प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी १० पर्यटन स्थळांना भेट देऊन भारताचा सन्मान वाढवावा.भारतातील राजे-महाराजे यांचे साहित्य,किल्ले,काश्मिरसारखी पर्यटनस्थळे,देवी-देवतांची नामांकित स्थळे,ताजमहल, कुतुबमिनार सारखी अनेक ऐतिहासिक स्थळे भारतात आहेत.पर्यटनाला चालना मिळावी म्हणून मागीलवर्षी अमेरिकन भारतीयांनी दरवर्षी पाच अभारतीय कुटुंबाना पर्यटक म्हणून भारतात पाठवावे असे आवाहन “ह्युस्टन”येथील “हाऊदी मोदी”कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी केले होते.कारण यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.जगात अनेक महत्वपूर्ण ठिकाणे आहेत.परंतु काही पर्यटन ठिकाणे निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे दुर्लक्षित होतांना दिसतात.ती वाचविण्यासाठी जगातील प्रत्येक देशांनी पुढाकार घेतला पाहिजे व पर्यटनाला वाचविले पाहिजे.वाढते प्रदुषण,प्लास्टिकचे दुष्परिणाम, जगातील वाढते तापमान,भुकंप, सुनामी, महाप्रलय यामुळे पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो व याचा दुष्परिणाम पर्यटकांवर होत असतो.याला कुठेतरी रोखण्याची गरज आहे.याकरिता संपूर्ण जगाने विचार मंथन करण्याची गरज आहे.जगातील वाढत्या तापमानामुळे मोठमोठी ग्लेशीअर वितळत आहे.यामुळे पर्यटनावर,पर्यटकांवर आणि निसर्गावर विपरीत परिणाम होतांना दिसतो.आज भारतातील व जगातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ म्हणून गुजरात मधील नर्मदा नदीच्या काठावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा “स्टॅच्यु ऑफ युनिटी” भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.या व्यतिरिक्त भारतात इतकी पर्यटनस्थळे आहेत की त्यांची तुलना करने कठीण आहे.भारतात गडकिल्ले, पुरातन भव्य मंदिरे, अजंठा वेरूळ सारख्या लेण्या, ताजमहाल इत्यादी अनेक ऐतिहासिक ठिकाणे पर्यटनाच्या बाबतीत प्रसीध्द आहे.आज जगाच्या दृष्टीकोणातुन विचार केला तर संपूर्ण भारतच पर्यटन स्थळाचा केंद्र बिंदू आहे.भारतात पर्यटन स्थळी देव-दानव,ऋषि-मुनी,साधु-संत,वेषभुषा,पुजापध्दती, भारतीय संस्कृती, विविध भाषा,थोरमहात्म्यांचा व क्रांतीकारकांचा इतिहास अशा अनेक वेगवेगळ्या पध्दती, मनोरंजन, साहित्य, पौराणिक कथा, इतिहास व संस्कृतीचे दर्शन भारतातील पर्यटन स्थळी पहायला मिळते व पर्यटकांचे मन मोहून जाते.भारतात अनेक धर्माचे व पंथाचे लोक रहात असल्यामुळे याठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीची पर्यटनस्थळे भाषा सुध्दा पहायला मिळते.भारतातील खान-पानाच्या पध्दतीचा विदेशी पर्यटक मोठ्या आनंदाने स्वाद घेतात.भारतातील इतिहास आहे की एकट्या महाराष्ट्रात ३१७ गडकिल्ले आहेत यातील फक्त ९६ गडकिल्ले पर्यटनस्थळे आहेत.परंतु आजही २२१ गडकिल्ले पर्यटनाची व पर्यटकांची वाट पाहत आहे.यावर महाराष्ट्र सरकारने विचार करून संपूर्ण गडकिल्ले हेरिटेज, लग्नसमारंभ, मनोरंजनात्मक कार्यक्रम याकरिता भाडे तत्वावर देवु नये.यामुळे पर्यटनस्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.याला नाकारता येत नाही.सरकारने स्वत:चे पैशे खर्च करून पर्यटनासाठी सुशोभित केले पाहिजे.यातच महाराष्ट्राचा फायदा आहे.यामुळे भारतातील पर्यटनामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागेल.कारण महाराष्ट्राचा इतिहास अजरामर आहे.भारतात आजही औरंगाबादला “पर्यटनसिटी”म्हणुन संबोधल्या जाते.

पर्यटनाला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे कारण यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते.आज संपूर्ण विश्र्वाला पर्यटन वाढविण्यासाठी सामोरे येण्याची गरज आहे.यामुळे जगात प्रदुषणमुक्त वातावरण निर्माण होईल,प्रत्येक देशात मित्रता वाढेल,पर्यावरणात सुधारणा होण्यास मदत होईल.या दृष्टीकोनातून २७ सप्टेंबरला संपूर्ण जगाने “संकल्प”केला पाहिजे की पर्यटन हेच जनतेला आनंद प्रदान करू शकते.विश्वातीव देशांनी पर्यटनाकडे जातीने लक्ष दिले तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आणि बळकट होईल.त्यामुळे प्रत्येक स्तरातुन पर्यटनाला चालना मिळायलाच पाहिजे.पर्यटनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात चालना मिळते.पर्यटनामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्रत्वाची भावना तयार होते.परंतु जानेवारी २०२० पासुन चिनीचांडालांनी पर्यटनाला व पर्यटकांना “ग्रहण” लावल्याचे दिसून येते.”अतीथी देव भव” म्हणजे पाहुण्यांचा सन्मान करने.परंतु चीनने संपूर्ण जगाच्या पर्यटनावर व पर्यटकांवर पाणी फेरल्याचे दिसून येते.त्यामुळे आज संपूर्ण जगासाठी “चीन विषेला साप” झाला आहे.जगात अनेक देशांमध्ये मोठ-मोठी पर्यटन स्थळे आहेत.परंतु “चामगाधड चीनी चांडालांनी” पर्यटनावर ग्रहण लावल्यामुळे पर्यटनापासुन येणारे अर्थसहाय्य संपूर्ण देशांचे बंद झाले आहे.त्यामुळे अनेक देश आर्थिक संकटात सुध्दा सापडले आहेत.कोराणा संक्रमण केव्हा संपेल व पर्यटण स्थळे केव्हा सुरू होईल हे सांगणे कठीण आहे.सध्याच्या परिस्थितीत पर्यटन आणि पर्यटक स्तब्ध असल्याचे दिसून येते.कारण सध्याच्या परिस्थितीत जगावर चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे तिसऱ्या महायुद्धाची “आहाट” ऐकु येत आहे.परंतु मानवजाती, जीवसृष्टी,वन्यप्राणी, पृथ्वी,जल यांना साबुत ठेवण्याकरिता व प्रदुषणावर मात करण्यासाठी जगाने पर्यटनाला प्रथम स्थान देवून पर्यटकांचे आकर्षण वाढविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे.
लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *