जालना (प्रतिनिधी) ः करोना सारख्या संसर्गजन्य आजारापासुन स्वताच्या बचाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी राज्य शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेला मोफत लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांनी आज येथे बोलतांना केले आहे.
महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद जालना, नगर परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील महाराष्ट्र हायस्कुलमध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज दि. 7 मे शुक्रवार रोजी आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सौ. गोरंट्याल बोलत होत्या.यावेळी डॉ.रितेश अग्रवाल, नगरसेवक संजय भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना सौ. गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहरात मागील काही महिन्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळुन आली आहे. योग्य ते उपचार मिळुन देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही निश्चित चिंतेची बाब असुन करोनापासुन बचाव करणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. या संसर्गजन्य आजारापासुन स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी मोफत लसीकरण्याचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे सौ. गोरंट्याल शेवटी म्हणाल्या. या कार्यक्रमास मुख्याध्यापक विष्णू धावडे, मुख्याध्यापक श्रीनिवास कारमपुरी, उपमुख्याध्याक आर. आर. पापणवार, डॉ. सिंदगी कडले, सौ. एस. जी. खंडागळे, सौ. एस. सी. निर्मळ, सौ. एस. बी. गुंजाळे, बी. जी .राजपूत, कुंडलिक राठोड व इत्यादींची उपस्थिती होती.
Leave a Reply