ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माजी आ. अरविंद चव्हाण यांच्याकडून मतदारांना धोका; मौजपुरी जिल्हा परिषद सर्कल विकासापासून वंचित

July 20, 202112:28 PM 77 0 0

अच्युत मोरे

जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील मौजपुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये रस्ते, पाणी, विज, नाल्या, यासह अनेक समस्यांचा सामना नागरीका करीत असतांना त्या समस्या न सोडवता या भागात विकासकामे करण्यासाठी आलेला निधी दुसर्‍याच सर्कलमध्ये खर्च करुन माजी आ. अरविंद चव्हाण यांनी मतदारासोबत धोका केला आहे. त्यांनी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला असल्याच्या तिव्र प्रतिक्रीया मौजपुरी सर्कलमधून व्यक्त केल्या जात आहेत.


माजी आ. अरविंद चव्हाण यांचे आणि मौजपुरी सर्कमधील मतदारांचे जुनेच नाते आहे. या जुन्या नात्याच्या आधारे त्यांनी या भागात अनेकवेळा सत्ता भोगली आहे. परंतु जालना आणि बदनापुर तमदार संघात फेरबदल झाल्यानंतर त्यांना सत्तेपासून दुर रहावे लागले होते. त्यांनी मध्यांतरी पक्ष बदलुन देखील पाहिले, परंतु त्यांना त्यातही यश आले नाही. अखेर आमदारकी नसली तरी त्यांनी भाजपमध्ये जाऊन जिल्हा परिषदेचे सदस्यत्व पदरात पाडून घेतले. आमदारकी गेल्यानंतर त्यांनी मतदारांकडे आणि मतदार संघाकडे पुर्ण पाठ फिरवीली होती. त्यांच्या कार्यालयावर होणारा चहापाणी देखील बंद झाला होता. मतदार संघातील लोकांची कामे करणे त्यांनी बंद केले होते. काही वेळा मतदारांच्या खिल्ली उडविण्याचे काम त्यांनी सुरु केले होते. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या कार्यालयाकडे जाणे देखील बंद केले होते. आता माजी आ. अरविंद चव्हाण हे केवळ एक ओळखीचे आणि एकेकाळी आमदार असलेले नेते होते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई चव्हाण यांना टिकीट मिळाले. आणि माजी आ. अरविंद चव्हाण यांनी मौजपुरी सर्कलमध्ये जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली. निवडणूका लागल्या आणि त्यांनी पुन्हा मतदारांना आश्वासनाची खैरात वाटायला सुरुवात केली. आपले जेने नेते आहेत, ते यापुढे आपल्याला धोका देणार नाहीत असे समजून मौजुपरी सर्कलमधील जनतेने त्यांना पुन्हा पदरात घेऊन बहुमतानी निवडून दिले. त्यांना विरोध करणार्‍या लोकांनाही मौजपुरी येथील नागरीकांनी मतदान करण्यास भाग पाडले. निवडून आल्यानंतर माजी आ. अरविंद चव्हाण हे आपल्या मतदार संघात पुन्हा चांगले विकास कामे करतील असा विश्वास जनतेला होता. परंतु माजी आ. अरविंद चव्हाण यांनी निवडूण आल्यानंतर सर्कल आणि सर्कलमधील जनतेला पुन्हा वार्‍यावर सोडून दिले. दुष्काळी परिस्थीती असतांना अनेक मतदार हे माजी आ. अरविंद चव्हाण यांच्याकडे गेले, प्यायला पाणी नाही, घोट घोट पाण्यासाठी भटकावे लागत आहे, काही तरी करा, अधिकार्‍यांना सांगून टँकर सुरु करा, पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था करा अशा विनंत्या मतदार करु लागले. परंतु त्यांनी मतद करणे तर सोडा तीथे थेट हेवेदावे करायला सुरुवात केली. आमदाराला जाऊन सांगा, ते करतील ना काही, असा सल्ला माजी आ. अरविंद चव्हाण यांनी द्यायला सुरुवात केली. शिवाय काम करणे दुरच राहीले, त्यांनी मतदारांना सहकार्य करणे सुध्दा थांबवले.

 

पुन्हा दुसर्‍यांदा धोका

माजी आ. अरविंद चव्हाण हे जनतेचा विश्वास संपादन करुन जनतेच्या काळजात घूसतात, तीथे मतदारांना आपलसं करुन त्यांचा विश्वासघात करातत, अशी चर्चा मौजपुरी सर्कलमध्ये सुरु आहे. त्यांनी मौजपुरी सर्कलमध्ये विकास करण्याचे आश्वासन देऊन विकास केला नाही. येणार्‍या काळात मौजपुरी जिल्हा परिषद सर्कल हे आरक्षीत होणार आहे. त्यांना मौजपुरी सर्कलमध्ये आरक्षीत जागेवरुन निवडणूक लढवता येणार नाही. हे त्यांना माहित असल्याने त्यांनी आपला मोर्चा दुसर्‍या सर्कलमध्ये वळवला आहे. मौजपुरी सर्कलमध्ये विकास निधी खर्च न करता तो इतरत्र खर्च करायला सुरुवात केली. त्यांनी पिरकल्याण भागात आपले नशिब अजमावायला सुरुवात केलीय, त्यांनी त्या भागात विकास निधी देऊन आपले स्थान निश्चित करण्याचा खटाटोप सुरु केला, परंतु मौजपुरी सर्कलमधील जनता पिरकल्याण भागातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असा चंगच काही मतदारांनी बांधला असल्याचेही एैकायला मिळत आहे. त्यांना भविष्यात किती यश मिळेल आणि जनतता त्यांच्या आश्वसनाला कीती बळी पडेह हे सांगता येत नाही, परंतु माजी आ. अरविंद चव्हाण यांनी मात्र मौजपुरी सर्कलमधील मतदारांना दुसर्‍यांना धोका दिलाय हे मात्र नक्की !

आणि त्यांनी देवाकडेही पाठ फिरवीली….

माजी आ. अविंद चव्हाण यांनी आमदार असतांना मौजपुरी येथील श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान येथ एक काम दिले होते. त्या कामाच्या शिलालेखावर आजही त्यांचे नाव दिसते. परंतु आमदार पदावरुन पाय उतार झाल्यानंतर मात्र त्यांनी देवाकडेही पाठ फिरवीली. किमान जिल्हा परिषद सदस्य पद घरात आल्यानंतर रामेश्वरी संस्थान येथे काही विका होईल असे वाटले होते. परंतु तसे काहीच झाले नाही. रामेश्वरी या देवस्थानाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातील नागरीक येत असता. गुढी पाडवा, शिवरात्री, श्रावण महिण्यात भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. श्रावण महिना आला की, रोज कुणाचा ना कुणाचा तरी अन्नदानाचा कार्यक्रम असतो. हे अन्नदान करणारे जिल्हा आणि राज्यभराच्या कानाकोपर्‍यातुन आलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी महिला, मुली, लेकरं यासह लाखो लोकांची रेलचेल असते, अशा गर्दीच्या ठिकाणी किमाण एखादे शौचालय, बाथरुम तरी असायला हवे होते, परंतु त्या ठिकाणी भक्तांसाठी एकही शौचालय किंवा बाथरुम नाही. या गर्दीत एखादी गरोदर महिला आली असेल तर तीला सरुक्षीत असे काहीच या ठिकाणी नाही. जनेतेचे नेतृत्व करणारे माजी आ. अरविंद चव्हाण यांनी या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ नये? याचा अर्थ काय? हा त्यांचा अज्ञानपणा आहे की, त्यांनी मुद्दाम त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले हा संशोधनाचा विषय आहे.

चर्चेला उधान…
लोक सरपंच पदापासून आमदार, खासदार, मंत्री होतात, परंतु माजी आ. अरविंद चव्हाण हे हे मात्र आमदार पदावरुन जिल्हा परिषद सदस्य आणि खाली…. आस प्रवास करीत आहेत हा देवाने दिलेला शाप तर नाही ना अशी चर्चा नागरीक करु लागले आहेत. एवढेच नाही तर वारंवार मतदारांना धोका देणे, विश्वास घात करणे, ज्या देवळात दर्शनाला जाऊन निवडूण येण्यासाठी याचना करतात त्याच देवस्थानात दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांच्यावर देव कोपलाय अशा कमेंन्टही मतदार संघातील मतदार करतांना पहायला मिळत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *