ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अमृत महोत्सव दिनी शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव माजी सैनिक चंद्रकांत खरात यांचा स्तुत्य उपक्रम

August 18, 202215:31 PM 12 0 0

जालना (प्रतिनिधी) : 15 ऑगस्ट स्वातंत्र अमृत महोत्सव दिनी स्व. कौशल्याबाई खरात यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्रथमिक शाळा अहंकार देऊळगाव येथील विद्यार्थ्यांना माजी सैनिक चंद्रकांत खरात, सुखदेव खरात, सुरेश खरात यांच्या वतीने शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कै. कौशल्याबाई गोपीनाथ खरात यांच्या स्मृती दिनानिमित्त 2018 पासून गावातील जिल्हा परिषद उच्च प्रथमिक शाळा अहंकार देऊळगाव येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प केलेला आहे. हा संपल्प पुढे कायम ठेवत 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वतंत्र अमृत महोत्सव दिनी शाळेतील इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सन्मानपत्र आणि स्वतंत्र दिनाविषयी ज्या विद्यार्थ्यांनी भाषण केले त्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात येवून शाळेच्या कुंपणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी सैनिक चंद्रकांत खरात म्हणाले की, गावाची उन्नती ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावर आणि गावातील शाळेवर अवलंबून असते. आपण या गावचा भूमिपुत्र, या शाळेतून शिक्षण घेतले व फौजमध्ये भरती झालो आणि 20 वर्ष महर रेजिमेंटमध्ये देश सेवा केली. या गावातून आणि शाळेतून शिक्षण घेऊन मोठे झालो. आपल्याला समाजाचे काही देणे लागते म्हणून मुलांना शिष्यवृत्ती वितरण करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत आहोत. या गावातील अनेक विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी आर्मी, पोलीस व अन्य फोर्समध्ये सहभागी होऊन देशाची सेवा करावी याकरिता आपण गावातील विद्यार्थ्यांना सम्यक करियर अकॅडमी मोफत प्रशिक्षण देत आहे. वेळोवेळी शैक्षणिक कार्यक्रमास उपस्थित राहून नेहमी काही ना काही योगदान करत असतो. यावेळी सेवानिवृत्त पोलिस सुरेश डावखरे, हिरालाल खरात, गोपीनाथ खरात यांनी स्वातंत्र्या विषय व शिक्षणासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजबीये, सर्व शिक्षक, गावचे सरपंच व उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ, माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, सम्राट अशोक मंडळ, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतूक करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *