जालना :- दि.19 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 या कालावधीत जालना जिल्हयात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकुण 20 गुन्हे नोंद केले असुन त्यात रु.5लाख 53 हजार 170 रुपये किमतीचा दारुबंदी गुन्हाचा मुदे माल जप्त करण्यात आला .त्यामध्ये संतकृपा हॉस्पिटल ,मंठा चौफुली जालना या ठिकाणी दुचाकी क्र. MH 21-AC -2913 हे वाहन बेकायदेशीर देशी दारु वाहतुक करित असताना जप्त करण्यात आले व नेर फाटा ता.जि.जालना येथे चारचाकी क्र.MH-21 V 5075 मध्ये बेकायदेशीर देशी दारु वाहतुक करीत असताना जप्त करण्यात आले .अशा विविध केलेल्या कारवाईत देशी दारु भिंगरी संत्रा 180 मि.ली. क्षमतेच्या 528 सीलबंद बाटल्या ,देशी दारु भिंगरी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 100 सीलबंद बाटल्या , विदेशी दारु च्या 30 सील बंद बाटल्या ,व गावठी हातभटृी दारु 220 लि. त्याचप्रमाणे गुळमिश्रीत रसायन 5525 लि. जप्त करुन लिटर जप्त करुन जागीच नाश करण्यात आले. असा एकुण 5 लाख 53 हजार 170 रुपयांचा दारुबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे वरील गुन्ह्यांमध्ये पुढील आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. राहुल कचरु जाधव रा. नेर ता.जि. जालना, हरीसिंग सवाईसिंग राठोड, रा. अहंकार देऊळगांव ता. जि. जालना, भगवान आसाराम बनसोडे रा. बदनापुर जि. जालना, ज्ञानेश्वर रंगनाथ बकाल रा. दाभाडी ता. बदनापुर जि. जालना, सुरज सुपडसिंग गुसिंगे (प्यासा ढाबा) रा. डावरगांव ता. बदनापुर जि. जालना राम जाधव रा. वडीवाडी ,लखन जाधव रा. हातवन, सुधाकर मच्छिंद्र कातुरे रा. दगडवाडी ता. बदनापुर जि. जालना इत्यादी आरोपी विरुध्द म.दा.का.1949 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले, असल्याची माहिती जालना जिल्ह्यातील नागरीकांना विनंती करण्यात येते की आपल्या गावातील परीसरामध्ये दारु निर्मिती वाहतुक विक्री तसेच अवैधरित्या मळी, मद्य, मद्यार्क बाळगणे, वाहतुक करणे, किंवा विक्री करणा-या इसमांची माहिती संपर्क क्र. 02482- 225478 व व्हाटसअॅप क्रमांक 8422001133 तसेच टोल फ्री क्र. 18008333333 या क्रमांकावर कळविण्याव यावी असे आवाहन अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Leave a Reply