उरण(संगिता पवार) ५ राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ डोस दिले जाते. उरण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल रविवार( दि. २६ रोजी उरण शहरात इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ गौतम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
उरण शहराचे उदिष्ट ३०५४ असे आहे. लाभार्थी २०५४ आहेत . पल्स पोलिओच्या दिवशी जी बालके वंचित राहिली असतील त्यांना पुढील ४ दिवस घरोघरी जाऊन डोस दिला जातो. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गौतम देसाई यांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आले. यावेळी वैदकीय अधिकारी डॉ. मृणालिनी कदम , सहाय्यक अधीक्षक अनिल ठाकूर ,अधि परिचारिका ,कृपा पाटील ,अधिपरिचारिका निवेदिता कोटकर ,,आरोग्य सेवक एस .एस .घरत ,आरोग्य सहाय्यक एच जे पगारे व अमृतकर ,, आदी उपस्थित होते. उरण शहराच्या हद्दीत बूथ – १०, ट्रांझिस्ट टीम ३ मोबाईल टीम १ असे – एकूण १४ बूथ असून, मोरा जेट्टी दत्त मंदिर मोरा , नगरपालिका शाळा नं. ३ मोरा, सॉलट ऑफिस भवरा मांगीर देव, बोरी नाका, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण एन. आय हायस्कूल सेंट मेरी स्कूल, जकात नाका, समाज मंदिर उरण, कोट नाका – मिठागर कार्यालय, कोकण ज्ञानपीठ कॉलेज आदी ठिकाणी बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.
Leave a Reply