राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे आज शैक्षणिक वर्षाचा पहिला दिन आनंदात साजरा करण्यात आला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन वर्षापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येत नव्हते.
ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन परीक्षा यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यामधला प्रत्यक्ष संपर्काचा दुवा राहीला नव्हता. आज दिनांक 20 ऑक्टोबर पासून शासकीय नियमानुसार लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व नियम पाळून महाविद्यालय उत्साहात सुरू झाले. विद्यार्थी संख्या थोडी कमी असली तरी उत्साहात आलेले होते. ही संख्या हळूहळू वाढेल अशी खात्री वाटते. उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी केले. तसेच डॉ. गोवर्धन खेडकर, प्रा. भिमराव वाघ,डॉ. ज्योती धर्माधिकारी, प्रा. पालवे, डॉ. विजय केंदळे, प्रा. ज्ञानेश्वर नागरे,Dr.Khade Sominath प्रा. शेख वहाब, श्री चत्रभुज मुंढे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले
Leave a Reply