ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक समितीसाठी चैतन्यदायी, प्रेरक मंगळवार कुर्डूवाडी – बार्शीत समिती प्रेमीमध्ये उत्साह

October 21, 202114:50 PM 44 0 0

सातारा (प्रतिनिधी)  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने सर्व तालुका शाखांपर्यंत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढविण्याचे अभियान गेले महिनाभर सुरु असून *मंगळवारी असलेली ईद ए मिलादची सुट्टी शिक्षक समितीच्या संघटनात्मक कार्यासाठी चैतन्यदायी ठरली. माढा तालुका हा  खरे तर शिक्षक समितीचा बालेकिल्ला ! मात्र कार्यकर्त्यांना प्रेरित करुन मरगळ झटकून कार्य ऊर्जा देण्याची गरज होती. तीन आठवड्यापूर्वी शाखा संवाद बैठकीत वैचारिक देवाणघेवाणीतून जिद्दीने कामाला लागण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता . त्याचा अनुकूल इम्पॕक्ट काल झालेल्या भव्यदिव्य नेटक्या , दिमाखदार कार्यक्रमात दिसून आला. गुणीजनांच्या सन्मान सोहळ्यातून चांगुलपणाचा गौरव करण्यात आला. समितीचे कार्यकर्ते किती कल्पक ,कष्टाळू , मेहनती आणि झोकून देऊन काम करणारे असतात याची प्रचिती कालच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली . सुमारे ३७५ हून अधिक शिक्षक बांधवांच्या उपस्थित संपन्न झालेला हा कार्यक्रम तब्बल साडेतीन तास चालला…. अपेक्षित संख्येपेक्षा गर्दी वाढत गेल्याने दोन वेळा केटर्स कडून खुर्च्या नव्याने मागवून घ्याव्या लागल्या पण या धांदलीतही कार्यक्रमाच्या शिस्तीला कुठेही बाधा आली नाही हे विशेष  !

गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहाबाहेरची गर्दी देखील कुठेही विचलित होवू न देता संयोजन समिती आणि तिन्ही सूत्रसंचालकांनी शेवट पर्यंत कार्यक्रमावरील ताबा ढिला होवू दिला नाही त्यामुळे कुठल्याही टप्प्यावर कार्यक्रम रेंगाळला नाही हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तालुकाध्यक्ष कैलास काशीद , संजयमामा पतसंस्थेचे चेअरमन राजन सावंत , पुरोगामीचे चेअरमन मधुकर डोंगरे सर* आणि या तिन्ही संस्था …संघटनांच्या पदाधिकारी आणि निष्ठावंत पदाधिकारी….कार्यकर्ते यांच्या कष्टाचे चीज झाले . माढा तालुक्याच्या शिक्षक समितीला जुने वैभव प्राप्त झाल्याच्या अनुभूतीने जिल्हा सुखावलाय   त्यानंतर बार्शी येथे सायंकाळी ४ ते ८ या वेळेत बार्शी / वैराग भागातील क्रियाशील ५० कार्यकर्त्यांची बैठक संपन्न होऊन आगामी काळासाठी व्यूहरचना निश्चित करण्यात आली*. जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन विकास उकीरडे , अध्यक्ष रामराजा ताकभाते , रंगनाथ काकडे यांच्यासह *सर्व प्रमुख मंडळीनी स्व.बसाटे गुरुजी यांच्या काळापासून असलेले वैभव बार्शी टीमने एकोप्याने टिकवले असून ते अनेकदा सिद्ध केले असून यापुढील काळात त्यामध्ये अधिकची भर घालण्याचा निर्धार बोलून दाखविला. जिल्हाध्यक्ष अनिलबापू कादे यांनी संघटना बांधणीसाठी उपक्रम हाती घेण्यासाठी २५०००/- रु. आर्थिक मदत निधी सुपुर्द केला . माढा व बार्शी तालुक्याच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा शाखेच्या वतीने राजेंद्र नवले , दयानंद कवडे , अनिल कादे , सुरेश पवार , अमोघसिद्ध कोळी , राजन सावंत , प्रताप काळे , रंगनाथ काकडे , सुनिल कोरे, चंद्रकांत पवार , सचिन गरंडे* इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *