उरण ( संगिता पवार ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पंचायत समिती उरणच्या माध्यमातून व ग्रामपंचायत सोनारी यांच्या सहकार्याने सोनारी सिद्धिविनायक तलाव येथे बुधवार ( दि .२० )स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.
. सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उरणच्या . सभापती समीधाताई म्हात्रे, उपसभापती शुभांगीताई पाटील, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या वैशालीताई पाटील, , सदस्य दिपक ठाकुर, सोनारी ग्रामपंचायतच्या. सरपंच पूनम कडू व सर्व सदस्य,. जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, . जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक प्रतिम सुतार, बँकसखी गौरी कडू, समुदाय संसाधन व्यक्ती किशोरी कडू, अंकिता तांडेल, जसखारच्या समुदाय संसाधन व्यक्ती प्रिती ठाकूर ,समुदाय संसाधन व्यक्ती निर्मला प्रभाकर घरत त २१ स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. सदर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी गट विकास अधिकारी श्रीमती नीलम गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply