जालना (प्रतिनिधी)ः ”आकडे” लावल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत तर अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ”आकडे” कीती भयानक असतात याचा प्रत्येय येतो. परंतु ”आकडे” पाहिल्याने उध्वस्त होणारे कुटुंब आणि उघड्यावर येणारे संसार वाचतील हे मात्र नक्की ! त्यामुळे ”आकडे” लावायचे की, ”आकडे” पहायचे हे आता आपणच ठरवायचे आहे. अशाच उध्दस्त होणार्या कुटुंबाला वाचविण्यासाठी जालना येथील कलावंताने तयार केलेला ”आकडे” लघुपट (शॉर्ट फिल्म) सर्वांच्या भेटीला आला आहे. दि. 20 जुलै 2021 रोजी हा लघुपट (शॉर्ट फिल्म) यु-ट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
जालना येथील छत्रपती फिल्म प्रस्तुत तसेच अजिंक्यराज काकडे लिखित आणि दिग्दर्शित ”आकडे” (THE NUMBER) लघुपट (शॉर्ट फिल्म) आहे. पवार कोचिंग क्लासेस, आझाद मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष व ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते हा लघुपट (शॉर्ट फिल्म) प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक जाणिवेतुन हा लघुपट तयार करण्यात आला असून परीक्षा – पालक – विद्यार्थी- निकाल या भोवती फिरणारा लघुपट आहे. पास आणि नापास यात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिशा देणारा हा लघुपट आहे. असे निर्माते, लेखक यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिक्षेच्या किंवा विद्यार्थी दशेतुन जाणार्या सर्वांनीच व पालाकांनी हा नक्की बघायला हवा. सदरील लघुपट हा (शॉर्टफिल्म) यूट्यूब वरील छत्रपती फिल्म्स जालना ह्या चॅनेलवर विनामुल्य उपलब्ध आहे. प्रदर्शन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण पवार (ग्रामविकास अधिकारी, जालना), पंढरीनाथ कोल्हे, मोहन पवार ( संचालक पवार कोचिंग क्लासेस, जालना) मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष अच्युत मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी लघुपटाचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक अजिंक्यराज काकडे, कलाकार मुकुंद दुसे, सतीश लींगडे, सुमित शर्मा, ओमकार बिनीवाले, श्रीमती रेखा चव्हाण, निलेश प्रधान, बालाजी टेकाळे, परमेश्वर शिंदे(एडिटर), सागर सिडाम, अभिमान चौधरी, नचिकेत गाडेकर, गणेश राठोड, वल्लभ हिरवे यांची उपिस्थिती होती.
Leave a Reply