औरंगाबाद : बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शासकीय वेबसाईटवरून डाटा चोरी करून एका खाजगी वेबसाईटच्या साहाय्याने हे बनावट मतदान कार्ड बनवले जात होते. याबाबत नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी तपासाची चाके फिरवत हरीश वाघमारे आणि नवनाथ शिंदे या दोघांना अटक केली आहे.
वरील दोन्ही आरोपी महा ई सेवा केंद्र आणि खाजगी कॉम्प्युटर सेंटरवर बसून बनावट मतदान कार्ड बनवत होते. पोलिसांनी या सेंटर वर छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि हेराफेरी करण्यासाठी वापरले जाणारे त्यांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुंडलिक नगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे बनावट मतदान कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
Leave a Reply