ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दडपणाशिवाय व्यक्त होणे हाच लेखकधर्म : डाँ .संजीवनी तडेगावकर

July 9, 202112:40 PM 75 0 0

जालना ( प्रतिनिधी) : मराठी साहित्य समृध्द करण्यात स्त्री साहित्याचा वाटा मोठा आहे. कविता , कथा , कादंबरी , आत्मचरित्र या वांड्:मय प्रकारात लेखिकांनी अत्यंत दर्जेदार लेखन करून साहित्याची परंपरा उज्वल केली असून “लेखकाने सतत समाजासमोर साहित्यातून आरसा धरण्याचे काम करायला हवे , कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्त होणे हाच लेखकधर्म ” आहे. असे प्रतिपादन ख्यातनाम कवयित्री, मसाप च्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी आज येथे बोलतांना केले.

डॉ सुरेखा मत्सावार लिखीत स्वप्नांच्या अलिकडले व किनारा हे दोन कथासंग्रह आणि महात्मा गांधी प्रणित शिक्षण संकल्पना या संशोधनपर ग्रंथांचे प्रकाशन गुरुवारी ( ता. ०८) डॉ संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले . साई स्क्रीन सेंटर येथे छोटेखानी सोहळ्यात डॉ .तडेगावकर बोलत होत्या. या वेळी इंजि. एस. एन. कुलकर्णी, डॉ. जितेंद्र मत्सावार, डॉ. प्रतिभा श्रीपत, मसापचे सचिव पंडितराव तडेगावकर, शिवाजी कायंदे, डॉ. सुरेखा मत्सावार, शुभांगी नेवासेकर, वैशाली मत्सावार यांची उपस्थिती होती.


डॉ संजीवनी तडेगावकर पुढे म्हणाल्या, डॉ. सुरेखा मत्सावार यांच्या वास्तव अनुभवाच्या कथा पुस्तक रूपाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या कथांमधील स्त्री पात्र अत्यंत सोशिक ,चतूर, चाणाक्ष आणि सक्षम अशा रूपात वावरताना दिसतात.आजुबाजूला वावरणारी प्रत्यक्ष माणसं वाटावीत इतकी जिवंत होवून जातात. मत्सावार यांच्या स्त्री प्रधान कथांमधून अनेकदा स्त्रीवादी विचार डोकावताना दिसतात. सातत्याने लेखन करणा-या मत्सावार यांनी चांगले कथासंग्रह वाचकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल कोरोनाच्या या कठीण काळात दिलासादायक असल्याचे डॉ संजीवनी तडेगावकर यांनी सांगितले. इंजि. एस. एन. कुलकर्णी यांनी मराठी साहित्यात स्त्री साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान ठरलेले आहे.ताराबाई शिंदे ,सुनिता देशपांडे, इंदिरा संत,महदंबा,जनाबाई अशी कितीतरी सम्रुध्द परंपरा सांगता येईल. मत्सावार यांच्या कथासंग्रहातील स्त्री नायिका आजही समाजात दिसतात असे एस.एन.कुलकर्णी यांनी नमुद केले . डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी कथासंग्रहातील प्रत्येक कथेमागे एक उपदेश तथा समुपदेश असल्याचे जाणवते असे म्हटले.दहा नंतर अकराव्या घरी यातील एकतरी पात्र पहायला भेटते एवढी समाजाभिमुख पात्रे मत्सावार यांच्या लेखनीचा विषय आहे.असे त्यांनी नमूद केले.
सुञसंचालन पंडितराव तडेगावकर यांनी केले तर डॉ. जितेंद्र मत्सावार यांनी आभार मानले.
पैलू समजल्यास जगणे सुलभ होते: डॉ. मत्सावार
मानवी जीवनात सुखदुःखाचे अनेक पैलू आहेत ते समजून घेतल्यास जीवन जगणे सुलभ होऊन जीवनाचे खरे स्वरूप स्पष्ट होऊन निर्णय क्षमता वाढीस लागते. असे लेखिका डॉ. सुरेखा मत्सावर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्यामुळे आपणास म. गांधी कळाले , कुशल मनुष्यबळ निर्मितीस उपयुक्त शिक्षण संकल्पना, स्वावलंबी शिक्षण ग्रंथात मांडले. आयुष्याच्या सुख- दु:खाची ” किनार ”
स्वप्नांच्या अलिकडील वास्तवाची ग्रंथात मांडणी केल्याचे डॉ. सुरेखा मत्सावार यांनी स्पष्ट केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *