धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांना सुगावा लागला होता. पोलिसांनी छापा मारत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला गजाआड केलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे यांच्या घरावर छापा टाकला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री, त्याचबरोबर बनावट नोटा, संगणक, मोबाईल, बँकेचे पासबुक असा 48 हजार 307 रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.
Leave a Reply