जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात करोना महामारीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी गरजु लोकांना किराणा किट, धान्य, जेवणाची पाकीटे, रेडमिसिविर इंजेक्शन, बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे या उपक्रमात फकिरा वाघ यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांचा काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ. कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, शहर अध्यक्ष शेख महेमुद यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने मागील काही महिने लॉकडाऊन लागू केले होते. यामुळे गोर-गरीबांच्या हाताचे काम हिरावल्याने मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. रोज कमाई करून पोटाची खळगी भरविणारा लॉकडाऊनमुळे एकवेळचे जेवण देखील भेटत नव्हते अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी गरजु लोकांना धान्य व जेवणाचे पाकीटे वाटप करून मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, कल्याण दळे, सत्संग मुंढे, वसंत जाधव, राम सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply