दहा दिवस राहीलात पाहुणा होऊन ,
गणेशा ! का जाता आम्हाला सोडून ?।।धृ.।।
तूम्ही येताच आमच्या घरी
बरसल्या श्रावण भादव्याच्या सरी
मोद वाहीला ओसंडून…गणेशा….
रूप तुमचे आगळे वेगळे
कसे आकर्षित होती सगळे
लहान मोठे होती सेवेत तल्लीन…गणेशा…
वक्रतुंड चतुर्भूज साजे
पायी घागर्या रूणझुण वाजे
मोदक खातो फार आवडीनं…गणेशा !…
तुमचा उत्सव आनंदाचा
किती उल्हास तना-मनाचा
भक्ती भावानं सारे करती पुजन…गणेशा !..
वार्षीक उत्सव किती थाटाचा
हर्ष द्विगुणीत लहान मोठ्यांचा
निरोप देता माञ येती डोळे भरूनं..गणेशा ! …
बाप्पा ! आम्हाला नको हो काही
कमी करा माञ ही महागाई
पर्जन्यमान होऊ दे , समाधानान…गणेशा !….
विनंती करते जोडून कर
पुढच्या वर्षी या ,पण आणू नका महापूर
‘ माया ‘ दुर्वांकुर वाहते श्रध्देनं
गणेशा ! का जाता आम्हाला सोडूनी
©®माया तळणकर. नांदेड.
९३२५०२८३७६
Leave a Reply