उपवासाला जर दहीवडा मिळाला तर? भारीच ना? तुम्हीदेखील असा दहीवडा घरच्या घरी बनवू शकता. या नवरात्रीला हा प्रयोग नक्की करून पाहा.
साहित्य –
400 ग्रॅम बटाटा
शिंगाडा पीठ 50 ग्रॅम
चवीप्रमाणे काळे मीठ
1 चमचा काळी मिरी पावडर
कोथिंबीर
400 ग्रॅम दही
तळण्यासाठी तूप वा तेल
कृती
https://wa.me/message/KJZHCLIYUUHKJ1बटाटे उकडून त्याची सालं काढून ते कुस्करून घ्या. त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ, काळे मीठ, काळी मिरी पावडर, कोथिंबीर तुम्हाला हवं असल्यास, वाटलेली मिरचीही घालू शकता. हे घालून मिक्स करून घ्या. हे सारण बटाट्यामुळे थोडं चिकट होतं. त्यामुळे त्याचे गोळे करून ते तळताना पाण्याचा हात लावावा लागतो. कढईत तूप अथवा तेल तापवून हे वडे तळून घ्या. वडे गार झाल्यावर दह्यात बुडवा आणि खायला देताना कोथिंबीर आणि तिखट वरून घाला. तुम्हाला हवं असल्यास, दह्यात साखर घालून ती त्यामध्ये विरघळवून दही थोडं सैलसर करून ठेवा. हे अधिक चविष्ट लागते.
अश्विनी निलेश धोत्रे.
Leave a Reply