ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 9 ऑगस्टपासून उपोषण

July 28, 202115:12 PM 35 0 0

जालना/प्रतिनिधी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी इंदेवाडी येथील मिळकतीबाबत जिल्हा प्रशासनाला स्थायी समिती नेमुण विकास कामास परवानगी द्यावी असे निर्देश असतांना सुध्दा जालना जिल्हा प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी 9 ऑगस्टपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


जालना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. जालनाने मौजे इंदेवाडी (ता.जालना) येथील गट क्रमांक 32 मधील क्षेत्र 63.77 आर. जमीनीपैकी 97 आर जमीन संस्थेला निवासी प्रयोजनासाठी दिलेली आहे. या मिळकतीवर विकास कामे करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून प्रशासनाला संस्थेच्या वतीने 12 स्मरणपत्रे दिली. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी जालना जिल्हा प्रशासनाला स्थायी समिती नेमुण विकास कामास परवानगी द्यावी, असे निर्देश दिलेले आहे. मात्र प्रशासनाकडून मुद्दाम टाळाटाळ होत आहे. जिल्हा प्रशासनाने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाच्या अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 ऑगस्टपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, एम.यु. पठाण, वामनराव दांडगे, रामेश्‍वर शिंदे पाटील, वसंतराव राठोड, श्रीमती रंजना जाधव, अशोकराव पाईकराव यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष भारत राऊत, सचिव वामनराव दांडगे यांच्यासह इतरांची नावे आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *