जालना/प्रतिनिधी आष्टी (ता.परतुर) येथे माजी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी केलेला अपहार, अनियमितता व गैरकारभाराची चौकशी करून, संबंधीताविरोधात कारवाई करण्यासाठी 8 जणांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे.
उपोषणास बसण्यापुर्वी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अधिकृत जुने भाडेकरूंना वगळणे, अनाधिकृत गाळेवाटप व बांधकाम, आचार संहिता उल्लंघन, ग्रामसभेचा अपमान, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदि आरोप आहेत. आष्टी येथील ग्रा.पं. मध्ये माजी सरपंच व ग्रामविकास अधिकारी डी.बी. काळे यांनी अनियमीतता केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी झाली मात्र,अद्यापपावेतो संबंधीताविरूध्द कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आदर्श आचारसंहिता भंग, ग्रामसभा व मासिक सभांचा अपमान व फसवणूक, आर्थिक फसवणूक, शासन योजनांचा गोरगरीब लाभार्थ्यांना लाभ न देणे आदि मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. आष्टी ग्रामपंचायतीचे बे कायदा कामे प्रक्रिया व निर्णय रद्द करावे, याची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी या मागण्यांचा समावेश आहे. उपोषणास सोमनाथ नागनाथ शेटे, शेख .खालेक, महेमुद कासम पठाण, अकबर शेख अहेमद, मोहम्मद मुनीर शेख, सुंदर सवणे, मो. खलील वजीर, अजीम अकबर पटेल हे बसले आहेत.
Leave a Reply