जालना (प्रतिनिधी) ः जालना पोलीस दलातील निलंबीत पोलिस कर्मचारी संजय कटके व इतरांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी तपासी अधिकारी स.पो.नि. सुरेश खाडे यांनी 2 डीबीचे पथक तयार करुन त्यांचा कसुन शोध सुरु करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, बोरखेडी ता. जि. जालना येथील गट क्र. 54 मध्ये शेतावर कब्जा करण्याच्या हेतुन दि. 4 मे 2021 रोजी निलंबीत पोलिस कर्मचारी संजय कटके व त्यांच्या पत्नी जयश्री कटके, संतोष कडूबा पवार, हरीभाऊ कडूबा पवार यांनी आपल्या 4 ते 5 जनांसह कोयत्याने हल्ला करुन सारीका कटके, सुरेश क्षीरसागर, विक्रम क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर यांना जिवे मारण्याच्या हेतुने हल्ला केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
यावेळी काही लोकांनी मध्यस्थ केल्याने पुढील अनर्थ टळला, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सुरेश क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संजय कटके यांच्यासह त्यांच्या साथीदारावर कलम 307, 327,323, 34,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी संजय कटके यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी पोलीस दलात असतांना अनेकांना धमकाने, मारहाण करणे, जागा हडपणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. तसेच त्यांनी केलेल्या अतिक्रमणाची चर्चा देखील रंगली आहे.
त्यांच्या विरोधात चार-पाच तक्रारी दाखल – पो.नि. शेळके
संजय कटके यांचा शोध घेण्यासाठी आख्खे पोलीस ठाणे आहे. त्यांच्या कारनाम्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. त्यांच्या विरोधात आतापर्यत 4 ते 5 तक्रारी दाखल आहेत. त्यांचा शोध घेऊन लवकरच त्यांना अटक करणार असल्याचे पो.नि. शेळके यांनी सांगीतले.
संजय कटके हे कुठेही दिसल्यास तात्काळ पोलीसांना संपर्क साधा – स.पो.नि. सुरेश खाडे
पोलीस दलातुन निलंबीत संजय कटके यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात 307 चा गुन्हा दाखल आहे. त्यांनी कोयत्याने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या शोधासाठी डीबीचे दोन पथके तयार असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. तसेच संजय कटके आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही कोरोना पॉझीटीव्ह आहेत. असे असतांना त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे गजरेचे आहे. ते जर उपचार न घेता बाहेर फिरत असतील तर ते कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. ते एक पोलीस कर्मचारी असल्याने व ते जालना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यांच्या सर्वत्र ओळखी आहेत. त्यामुळे ते कुठेही आणि कोणजवळही जाऊन बसू शकतात, त्यामुळे संजय कटके यांच्यापासून इतरांना धोका असून त्यांच्यापासून सावध रहावे व काळजी घ्यावी. संजय कटके कुठेही दिसले तर नागरीकांनी तात्काळ पोलीसांना संपर्क साधावा असे आवाहन स.पो.नि. सुरेश खाडे यांनी केले आहे.
Leave a Reply