ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथील विद्यार्थ्यांची वज्रेश्वर रुग्णालय येथे क्षेत्रभेट

October 24, 202112:54 PM 15 0 0

जालना(अनिता पवार) : दिनांक 22/10/2021 रोजी जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथून हेल्थ केअर या विषयाची अधिक माहित मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची वज्रेश्वर रुग्णालय जाफराबाद येथे क्षेत्रभेट घेण्यात आली .ह्या मध्ये हेल्थ केअर च्या शिक्षिका वैशाली राऊत मॅडम यांचा सर्वात मोठा सहभाग होता.जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथे व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले.त्या मध्ये हेल्थ केअर हा विषय वर्ग 9 व वर्ग 10 या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला.

वज्रेश्वररुग्णालय येथे डॉ.हरिदास फुके सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना रुग्णालय विभाग ,शारीरिक मानसिक बदल,आरोग्य शिक्षण , औषधोपचार,विविध आजाराची माहिती व त्यावर उपचार,विविध उपकरणाची माहिती विद्यार्थ्यांना डॉ.हरिदास फूके सर यांनी दिली.जिल्हा परिषद प्रशाला जाफराबाद येथील मुख्याध्यापक शिवहरी ढाकणे सर व हेल्थ केअर चा शिक्षिका वैशाली राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेट घेण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *