ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आकडे लघुपटातील कलाकारांचा सत्कार

July 31, 202114:30 PM 12 0 0

जालना (प्रतिनिधी) :   जालना जिल्ह्यातील कलाकार व दिग्गदर्शक निर्मित प्रसिद्ध अशा आकडे या लघुपटातील सर्व कलाकारांचा  सत्कार भाजपा सांस्कृतिक  सेलच्या वतीने शनिवारी करण्यात आला. याचप्रसंगी संगीत क्षेत्रात डॉक्टरेट संपादन केलेल्या विश्‍वविक्रमी तबलावादक पंडित प्रसाद चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला.

आकडे या लघुपटाने थोड्याच दिवसांत एक वेगळा ठसा उमटवून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिल्ह्यातील कलाकरांचे कौतुक व्हावे म्हणून हा सोहळा आयोजित केल्याचे जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी सांगितले. तत्पूर्वी कलाकरांनी आकडे लघुपट तसेच त्यांच्या रंगभूमी पार्श्‍वभूमीविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन संघर्षा शिवाय उत्कर्ष नसल्याचे अधोरेखित केले. छत्रपती फिल्मचे अजिंक्य काकडे, कलाकार मुकुंद दुसे यांनी आकडे लघुपटाविषयी उपस्थितांना प्रसंग उलगडून दाखविले.  तबलावादक प्रसाद चौधरी यांनीही भारतीय चित्रपटांमध्ये देशभक्‍ती गीतांचा समावेश व चिकित्सा यावर पीएचडी करताना आलेले अनुभवांची माहिती दिली. सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनीही संपूर्ण कलाकारांचे कौतुक करून सर्व  कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वेगळ्या धाटणीचा लघुपट रसिकांचे मन जिंकत असल्याबाबत आनंद व्यक्‍त केला. याप्रसंगी सहभागी कलाकार सतीश लिंगडे, अजिंक्य काकडे, रेखा चव्हाण, सुमीत शर्मा, ओंकार बिनिवाले,नीलेश प्रधान,परमेश्वर शिंदे, अभिमान चौधरी, नचिकेत गाडेकर, सागर सेडाम आदींचा सत्कर यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशपांडे यांनी केले. यावेळी सुमित कुलकर्णी,राजेश दभाडकर, दीपा बिनिवाले,जान्हवी वैद्य,ज्योती जोशी,अपर्णा राजे,संपदा कुलकर्णी ,लक्ष्मी वाघमारे,आनंदी अय्यर,अरुणा फुलमामडीकर,नाईक आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *