जालना (प्रतिनिधी)ः जालना येथील चिरंजीव बाल रुग्णालयाच्या संचालकावर रुग्णाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी तक्रारदार यांची बदनामी करण्याच्या हेतुने व त्यांच्यावर खोटे आरोप करुन अपप्रचार केल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की, जालना शहरातील चिरंजीव बाल रुग्णालयाचे डॉ. उमेश करवा व मेडीकल चालक संतोष कदम यांनी संगनमत करुन रुग्णाकडून तसेच शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असे दोन वेळा पैसे घेऊन रुग्णाची आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणी मिलींद हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा बचाव करण्यासाठी तसेच स्वतःची बदनामी होऊ नये यासाठी फिर्यादीची बदनामी करुन त्यांनी पैसे मागीतल्याचा आरोप करुन फिर्यादीची प्रसार माध्यमातुन बदनामी करुन अपप्रचार सुरु केला होता. याची माहिती फिर्यादीला मिळताच त्यांनी सदरी बाजार पोलीस ठाण्यात जाऊन अपप्रचार करणारे डॉ. मधूर करवा यांच्यावर भादंवि.च्या कलम 499 व 502 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हा पो.हे.काँ. सिरसाठ हे करी आहेत.
आब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार – मिलिंद हिवाळे
मी माझ्या न्याय हक्कासाठी लढत असतांना व माझी आर्थिक फसवणूक झालेली असतांना देखील मी काही आवाजच करु नये यासाठी डॉ. उमेश करवा यांच्याकडुन पुर्ण प्लॅनिग करून माझी बदनामी करण्यात येत आहे. माझ्यावर पैसे मागीतल्याचा खोटा आरोप करुन स्वतःचे कारणामे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी बदनामी करणाऱ्या वर आब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे फिर्यादी मिलिंद हिवाळे यांनी म्हटले आहे.
Leave a Reply