ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

…अखेर शालेय गणवेशांचे घरोघरी वाटप

August 5, 202120:11 PM 58 0 0

नांदेड – शालेय मोफत गणवेश योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशांचे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन नुकतेच वाटप करण्यात आले. सदरील योजनेतील सर्वच लाभार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींसह खुल्या व इमाव गटातील मुलांनाही मोफत गणवेश देण्यात आला असल्याची माहिती जवळा देशमुख येथील मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी दिली.‌ यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गोडबोले, श्रावण गच्चे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे भीमराव गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, दीपकसिंह गव्हाणे यांची उपस्थिती होती.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेतील लाभार्थी मुले मुली यात अनुसूचित जाती – जमातीतील मुले, शाळेतील सर्व मुली तसेच बीपीएल मुले यांना प्रत्येकी दोन गणवेशांचा लाभ देण्यात येतो. गतवर्षीपासून कोरोनाकाळामुळे शाळा बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक एकच गणवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जवळा देशमुख येथे सन २०२०-२१ करीता लाभार्थ्यांच्या एकूण संख्येपेक्षा ६०% पेक्षा कमी रक्कम देण्यात आली होती. यातील त्रुटी दूर करून शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नाने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *