ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी। मराठा महासंघाचे अशोक पडूळ पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

March 23, 202112:56 PM 9 0 0

जालना ( प्रतिनिधी) : गत चार ते पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतला आहे. नुकसान ग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात सोमवारी ( ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात अशोक पडूळ पाटील यांनी म्हंटले आहे,अतिवृष्टीने खरीप हंगामातील उडीद, सोयाबीन, मुग, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी महत प्रयासाने वाचवलेल्या खरीप हंगामातील शेतमालाचा मुद्दल खर्च निघाला. असे अशोक पडूळ पाटील यांनी लेखी निवेदनात नमूद केले. खरीप हंगामातील नुकसानीची कसर रब्बी हंगामात निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, ह्या पिकांना पोटच्या गोळ्या सारखे जगवले. मात्र निसर्गाचे दुष्ट चक्र पुन्हा एकदा बळीराजा च्या पाठीशी लागले असून जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.द्राक्ष, मोसंबी, पपई या फळबागांचेही नुकसान झाले. दरम्यान कोरोना संक्रमण काळात शेतमालास मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई दिली जावी. नसता अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहिल. असा इशारा अशोक पडूळ पाटील यांनी लेखी निवेदनात दिला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *