ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोविड १९ मुळे निधन पावलेल्या पालकांच्या १६ मुलांना आर्थिक मदतीचा हात

October 30, 202114:04 PM 51 0 0

सिंधुदुर्ग,कुडाळ (अर्चना गडाळे-कदम) : कोरोनाने अनेकांच्या घरात मृत्यूने थैमान मांडलेले असताना त्याचा फटका शाळेतील मुलांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात देत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा दिलेला दिलासा म्हणजे एक मानसिक आधारच ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असताना कणकवली शाखेने शाळा बंद, शिक्षण सुरु च्या काळातही कलांकुर, स्वातंत्र्यदिन गीतगायन पंधरवडा, खजिना कथांचा, रक्तदान, विद्यार्थी दत्तक पालक योजना, खेळताना अपघात झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक पाच हजार रुपये निधी, मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन करणारा ‘गाऊ आनंदे’ उपक्रम, जिल्हा शाखेच्या वतीने ४५ लाखांचा निधी उभारून ऑक्सिजन प्लांट असे उपक्रम राबवले आहेत. पालकांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हित लक्षात घेऊन राबवलेले हे उपक्रम स्तुत्य असल्याबाबत अनेक मान्यवरांनी समितीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
यावर्षी कोविड मुळे निधन झालेल्या पालकांच्या १६ मुलांना कणकवली तालुका शाखा शिक्षक समितीच्या माध्यमातून रोख दोन हजार रुपयांची भरीव अशी तातडीची आर्थिक मदत करण्यात आली. त्यामध्ये युवराज योगेश गावकर (ओटव नं.१), अथर्व महेश राणे (बिडवाडी कणखरे), सिद्दिक सोनू शेळके (तळेरे नं. १), किमया सतीश राऊळ (तळवडे), समृद्धी अमित ठाकूर (हळवल नं. १), भूषण पांडुरंग गावकर (नाटळ खांदार), यश हेमंत भरणकर व भाविका हेमंत भरडकर (फोंडा बावीचे भाटले), हार्दिक सतीश राऊळ (तळवडे), मधुरा अनंत सुतार (घोणसरी नं. १), ओमकार रमेश सूर्यवंशी (ओझरम् नं. १), तनिष्का दशरथ तावडे (सांगवे गावकरवाडी), गणेश निलेश घाडीगावकर (तरंदळे नं. १), श्रावणी समीर चव्हाण (कळसुली भोगनाथ), सलोनी सत्यवान कानडे व स्वरा सत्यवान कानडे (शिवडाव मांगर) अशा मुलांचा समावेश आहे.
यावेळी तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष विनायक जाधव व तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी विशेष आभार मानले आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *