ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात डॉक्टर कडून रुग्णाची आर्थिक फसवणूक; गुन्हा दाखल

July 10, 202120:56 PM 120 0 1

जालना (प्रतिनिधी) : शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शासनाकडून तसेच रुग्णाच्या नातेवाईकाकडून असे दोन वेळा रुग्णावर उपचार केल्याच्या नावाखाली उपचाराचे बील घेऊन रुग्णाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात डॉ. उमेश करवा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या संदर्भात जालना येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक संजोग हिवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. यावेळी आम आदमी पार्टीचे अनिल ढवळे, फिरोज बागवान, दिपक हिवाळे, सुभाष बोर्डे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, जालना जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहेत आणि या घोटाळ्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व त्यांच्या अधिकार्‍यांना माहित असताना सुद्धा, त्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. याला पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री हेच एक प्रकारे घोटाळ्यांना अभय देत असून मूक पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक संजोग हिवाळे यांनी केला आहे. या घोटाळ्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजुन काही डॉक्टरवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही संजोग हिवाळे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या या घोटाळ्याच्या तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या, दोषी लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु या भ्रष्टाचारी डॉक्टरवर कारवाई न करता त्यांच्यावर पांघरुन घालण्याचे काम अधिकारी करीत होते, हा प्रकार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माहिती आहे, तरि सुध्दा त्यांनी कारवाई केली नाही किंवा कारवाईचे आदेश दिले नाहीत. याचा अर्थ काय हे सर्वांना माहित आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील खाजगी डॉक्टरच्या मदतीने भ्रष्टाचार केला जात आहे. पैसे नसलेले आणि गरीब घरातल्या रुग्णांना योग्य उपचार न देता त्यांना मरणाच्या दारात सोडले जात असल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

जर आम्ही खोटं बोलत असेल तर प्रशासनाने ज्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली ती उपलब्ध करून द्यावी, फुटेज देता येत नाहीत असे कोणत्या कायद्यात आहे ? हे जाहिर करावे. असे आवाहन संजोग हिवाळे यांनी केले आहे. चिरंजिव बाल रुग्णालयाचे डॉ . उमेश करा यांनी बाळाची तपासणी करून बाळाची प्रकृती खराब असल्याचे सांगून रुग्णाच्या नातेवाईकांना बाळाला अ‍ॅडमिट करण्यास सांगीतले. बाळावर उपचार करण्याचे बील रुग्णाच्या नातेवाईकाकडून घेण्यात आले व त्याच उपचाराचे बील महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सरकारकडून देखील घेण्यात आले. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी सतत पाठपुरावा करुन चौकशी करण्यास भाग पाडले व चौकशी अंती अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टरला अजुनही अटक करण्यात आली नाही. सात दिवसाच्या आत डॉ. उमेश करवा यांना अटक करावी नसता आरोग्यमंत्री राजेश टोपं यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही संजोग हिवाळे यांनी दिला आहे.

पोलीसांच्या प्रेसनोट मध्ये या गुन्ह्याचा उल्लेख नाही
पोलीस प्रशासनाकडून रोज मिडीयाला दिवसभरातील घडलेल्या गुन्ह्याची माहिती दिली जाते. प्रेस नोटच्या माध्यमातुन जिल्ह्यात कोणत्या भागात कोणत्या घटना घडल्या याची माहिती पत्रकारांना होते, परंतु डॉ. उमेश करवा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये दिली गेली नाही.

डॉक्टरचा बचावासाठी रुग्णाच्या नातेवाईकावर आरोप
गुन्हा दाखल झाल्यानंतर चिरंजीव बाल रुग्णालयाच्या डॉ. मधून करवा यांनी बचाव करण्याच्या दृष्टीकोनातुन रुग्णाच्या नातेवाईकांवर पैसे मागीतल्याचा आरोप केला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याकडे 1 लाख रुपये मागीलते होते असा अरोप केला आहे. परंतु या प्रकरणात पोलीसात तक्रार का केली नाही असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. गुन्हा दाखल होण्या आधी ही माहिती का दिली नाही, मिडीयाला याची माहिती का दिली नाही? हा केवळ रुग्णांच्या नातेवाईकांना बदनाम करणे आणि त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये, त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालता यावे यासाठी डॉ. करवा यांच्याकडून बचाव करण्यासाठी हे असे आरोप केले जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणने आहे.

अजुन एक डॉक्टर वेटींगवर
असाच भ्रष्टाचार करणारे आणि जालना जिल्ह्यात प्रतिष्ठीत म्हणून मिरवणारे आणखी एक डॉक्टरवर गुन्हा दाखल होणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुर्ण तयारी झाली असतांना व एक प्रत फिर्यादीस वाचण्यासाठी दिलेली असतांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया थांबवण्यात आली. परंतु हा गुन्हा देखील लवकरच दाखल होणार आहे असेही सुजोग हिवाळे यांनी सांगीतले. गुन्हा दाखल होण्याच्या अंतिम टप्यात पोलीस निरीक्षक यांना कुणाचा तरी फोन आला होता, त्यामुळे ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया थांबविण्यात आली आहे असे पोलील निरीक्षक यांनी सांगीतले असल्याचे संजोग हिवाळे यांनी यावेळी म्हटले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *