ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

May 14, 202212:53 PM 33 0 0

जालना  :- जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करण्याचे सक्त निर्देश देत या कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ.‍विजय राठोड यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जालना शहरात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचे नुकतेच प्रकरण समोर आले आहे. ही अतिशय गंभीर बाब असुन याबाबत पालकमंत्री महोदयांनीसुद्धा अशा प्रकारे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. जिल्ह्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी. ज्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणारी नोंदणी नाही, व्यवसायासाठी कुठलीही अर्हता नसताना पाटीवर डिग्री दर्शवुन व्यवसाय करणारे, विशिष्ट आजारावर रामबाण उपाय अथवा दुर्धर अशा आजारापासुन मुक्ती मिळवुन देण्याच्या नावाखाली जाहिरातबाजी करुन जनतेची फसवणुक करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात येऊन अशा डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.
ग्रामीण भागामध्ये गर्भवती महिलांची माहिती घेण्यात यावी. यामध्ये किती महिलांची प्रसुती झाली व किती महिलांचा गर्भपात करण्यात आला याची माहिती आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या मदतीने अद्यावत ठेवत मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग पद्धत राबविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
बोगस डॉक्टरांबरोबरच अनाधिकृतपणे वैद्यकीय, परिचर्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालये जिल्ह्यात सुरु आहेत का ? याचीही तपासणी करण्यात यावी. कुठलीही अनाधिकृत संस्था, महाविद्यालय आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *