जालना/प्रतिनिधी : जालना नगरपरिषद येथील कर विभागाला बुधवारी दि़. 28 रात्री उशिरा अचानक आग लागली़ या आगीत विभागातील महत्वाचे अभिलेखे जळून खाक झाली आहेत़ जालना नगरपालिका आपल्या भोंगळ कारभाराबाबत नेहमीच चर्चेत असते. नगरपरिषदेच्या 10 नंबरच्या दालनात असलेले कर विभागाला रात्री अचानक आग लागली़ या घटनेची माहिती मिळताच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केले़ अिग्नशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले़ मात्र या आगीत विभागातील सर्वच अभिलेखे जळुन नष्ट झाली आहेत़ शॉट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़
मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभाग सील करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे़ पोलिस तपासात आग लागली की लावली हे निष्पन्न झाल्यानंतर दोषिवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिला आहे. पालिका प्रशासनातील कर विभागात असलेल्या महत्त्वाच्या अभिलेख्यांना ही आग लागली होती. त्यामुळे कर विभागातील महत्त्वाचा दस्तावेज जळून नष्ट झाला आहे. आता या प्रकरणात पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि पुढे दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे मात्र जालनेकरांचे लक्ष लागून राहिले आहे़
Leave a Reply