ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा रस़्त्याची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करावी – रंजना पाटील

August 22, 202115:01 PM 18 0 0

उरण ( संगिता पवार ) सतत पडणाऱ्या पावसामुळे फिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.त्यामुळे पादचारी,पर्यटक आणि वाहन चालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.तरी ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रंजना चारुदत्त पाटील यांनी ओएनजीसी प्रकल्पाला दिलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.

उरण तालुक्यातील म्हातवली व नागाव ग्रामपंचायत हद्दीत केंद्र शासनाचा महत्वाचा ओएनजीसी प्रकल्प आहे.या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते,अशा वाहनांच्या वर्दळी मुळे उरण चार फाटा येथून पिरवाडी चौपाटी कडे जाणाऱ्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सदर रस़्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे फिरवाडी चौपाटी व गाव परिसरात ये – जा करणाऱ्या पादचारी नागरीकांच्या अंगावर उडणाऱ्या खड्ड्यांतील घाणीच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे.तसेच पिरवाडी चौपाटीवर ये जा करणाऱ्या वाहन चालकांना रस़्त्यातील खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पुढील महिन्यात ( १० सप्टेंबर रोजी) गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण येऊ घातला आहे.तरी ओएनजीसी प्रकल्पातील व्यवस्थापनाने उरण चार फाटा येथून फिरवाडी चौपाटी कडे जाणाऱ्या रस्त्यांचे दुरुस्तीचे काम गणेशोत्सवा पुर्वी हाती घ्यावे अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रंजना चारुदत्त पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *