ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मासेमारी बोटींचा अडथळा दूर करण्यासाठी 2 होल्डिंग पाँडच्या भिंती पाडून टाका मच्छिमारांची आग्रही मागणी

December 9, 202112:34 PM 61 0 0

उरण ( संगिता पवार ) निसर्ग, मच्छिमार आणि शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून पर्यावरणप्रेमींनी द्रोणगिरीमधील दोन होल्डिंग पाँड पाडून पाणी येण्याजाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी उरणमधिल मच्छिमार आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे.करंजा सागरी मार्गानजीक असणाऱ्या 70 स्लूज गेट्स भागातील खारफुटीला पाण्याच्या मुक्त प्रवाहाला अडथळा ठरत आहे. पर्यावरण प्रेमी आणि मच्छिमारांच्या प्रचंड दबावानंतर पांणजे येथील होल्डिंग पाँड -1 येथील 72 गेट्स आता खुली ठेवण्यात आली आहेत, मात्र असलेल्या भिंतींमुळे खारफुटी आणि पाणथळ क्षेत्राकडे जाणाऱ्या पाण्याचा मुक्त प्रवाह अडवला असून त्यामुळे मच्छिमारांच्या बोटींच्या वाहतूकीला अडथळा येत आहे. हनुमान कोळीवाडा ग्राम पंचायतीने अलीकडे एक ठराव मंजूर करून पाणजे,बोरी पाखाडी पाणथळ क्षेत्रातील भिंत पाडून मासेमार बोटींना होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी गावचे सरपंच प्रेमानंद पाटील यांनी शासनाकडे केल्याचे सांगितले.

दरम्यान नॅटकनेक्टने सिडको नोडल ऑफिसर पर्यावरण, प्रमोद पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, स्लूज गेट्समधून पाण्याचा प्रवाह येतो आणि भात शेतात अमाप पाणी साचते, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे.सिडको ही एक नियोजन पाहणारी एजन्सी आहे. तिने शेतकऱ्यांचा उद्देश पाहता,प्रभावित क्षेत्रात बांध घालावे. मात्र होल्डिंग पाँड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या मासेमारी बोटींच्या हालचालीला अटकाव होणार नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. असेही बी.एन.लकुमार यांनी म्हटले आहे.
पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समितीचे दिलीप कोळी यांनी सांगितले,2005-2006 मध्ये पाणजे भिंत तसेच 2015-16 दरम्यान करंजा बांध उभारण्यापूर्वी आमच्या बोटी समुद्रात मुक्त संचार करत होत्या.आता आम्हाला जागा राहिली नाही आणि कोणालाही आमच्या प्रश्नांत स्वारस्य नाही. असे पारंपरिक मच्छिमार कृती समितीचे दिलीप कोळी यांनी म्हटले असून ही ते पुढे म्हणाले की, सोनारी आणि करल-सावरखाल गावांच्या सरपंचांनी यापूर्वीच उरण तहसिलदारांना लिहिलेल्या पत्रात सांडव तसेच भिंत आणि जेएनपीटीकडून घालण्यात आलेल्या असमान भरावाने निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा मुद्दा अधोरेखित केला आहे. या गावांना हा भराव घालण्यापूर्वी पुराचा कोणताही इतिहास नसल्याचे पवार यांनी सांगितले.त्यांनी महसूल प्राधिकरणाकडून आलेला आरटीआय प्रतिसादही नमूद केला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *