जालना (प्रतिनिधी) ः राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र, जालना यांच्या वतीने भारतीय स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त फिट इंडिया फ़्रीडम रन 2.0 कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास गांधी चमन येथे 75 स्वयंसेवक तिरंगा हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा देवून देशसाठी बलिदान देणाऱ्या देशभक्ताना अभिवादन करण्यात आले. फिट इंडिया फ़्रीडम रन 2.0 कार्यक्रमाला भास्करराव दानवे यांनी हिरवी झेडी दाखवून रॅलीचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमाला प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रो. डॉ. टी. आर. पाटील, नेहरू युवा केंद्राचे शिवाजीराव खरात, श्री सुर्वे, जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, जालना शहरातील सर्व महाविद्यालयाचे कार्यक्रम आधिकारी, सात महाविद्यालयातील स्वयंसेवक उपस्थित होते. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 75 स्वयंसेवकांची रॅली गांधीचमन ते मोतीबाग पर्यंत शिस्तीने पार पाडली. स्वयंसेवकांच्या उत्साहाने नागरिकांचे लक्ष वेधले. यामध्ये विविध देशभक्तिपर घोषणा देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचल डॉ. सोमीनाथ खाडे यांनी तर आभार प्रा. डॉ. प्रशांतकुमर वंनजे यांनी मानले.
Leave a Reply