ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घारापुरी ग्रामपंचायतीत नेव्ही, कोस्टगार्ड अधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 17, 202114:31 PM 7 0 0

उरण (संगिता पवार) डोळ्यात तेल घालून देशाची अहोरात्र सेवा बजावणाऱ्या इंडियन नेव्ही कमांडर, कोस्ट गार्ड अधिका-यांच्या हस्ते व सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून घारापुरी बेटावर १५ ऑगस्ट भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला.


१५ ऑगस्ट भारताचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त इंडियन नेव्ही कमांडर, कोस्ट गार्ड अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांसह घारापुरी बेटावर उतरले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्हाला भारताचा तिरंगा बेटावर फडकावायचा आहे अशी विचारणा कोस्टगार्ड प्रमुख कमांडर अभिषेक गांगुली, नेव्हीचे कमांडर दिनेश जाधव तसेच त्यांचे अन्य सहकाऱ्यांनी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्याकडे केली. इंडियन नेव्ही,आर्मी,मिल्ट्रीचे जवान अहोरात्र देशाची सेवा करीत असतात. त्यामुळेच देशवासी सुरक्षित आहोत.त्यांच्या या देशसेवेबद्दल आदर बाळगून आणि जवानांच्या सन्मानार्थ ग्रामपंचायत घारापुरीच्यावतीने कोस्टगार्ड व नेव्हीच्या अधिकारी यांच्या हस्ते व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा व ध्वजारोहण करण्यास तत्काळ संमती देऊन विनंती केली. कोस्टगार्ड प्रमुख कमांडर अभिषेक गांगुली,नेव्हीचे कमांडर व दिनेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.त्यानंतर त्यांनी उपस्थितांना समुद्र सुरक्षा आणि १५ ऑगस्टचे महत्व सांगुन मार्गदर्शनही केले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य भरत पाटील, मंगेश आवटे, सदस्या मीना भोईर, सुभद्रा शेवेकर, शुभांगी मायने,राजिप मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *