ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये ध्वजारोहण कार्यकम

August 17, 202114:34 PM 7 0 0

उरण (संगिता पवार) स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त उरण शहरात ध्वजारोहण कार्यकम रविवारी (दि. १५) साधेपणाने आणि शासकीय नियम पाळून झाला. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी ७.२० वाजता नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. प्राथमिक शाळा क्र. ३ मोरा येथे सकाळी ७.३५ वाजता पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती राजेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शाळा क्र. १ व २ येथे महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल कासारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. समाज मंदिर भोवरा येथील प्रांगणात स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती गॅस यास्मिन मुहम्मद फाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.


या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर , नगरसेवक कौशिक शहा, मुख्यधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक नंदू लांबे, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका आशा शेलार , नगरसेविका गॅस यास्मिन मुहम्मद फाईक, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका जान्हवी पंडित, नगरसेवक मेराज शेख, नगरसेविका प्रियांका पाटील, नगरसेविका दमयंती म्हात्रे, जगदीश पाटील, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, संजय दाते, आकाश कवडे, हर्षद कांबळे, संदेश शिरकुलकर, रसिदा शेख, धनेश कासारे, अनिल कासारे, सफाई कामगार कर्मचारी उपस्थित होते.
उरण तहसील कार्यालयाच्या प्रारणांत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते ९:०५ रोजी ध्वजा रोहन करण्यात आले.
या वेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, महसूल नायब तहसीलदार पेढवी कर्मचारी, आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *