ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ध्वजारोहण कार्यक्रम

August 12, 202214:49 PM 16 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते आज १३ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वा. जमिनीपासून ५५ फुट उंचीवर ७ बाय १२ अशा भव्य राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संपन्न होणार असून या समारंभाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.


भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या हर्षोल्लासात विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. उद्यापासून १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १३ रोजी ५५ फुट उंचीवर भव्य राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमाला भिक्खू संघासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाने केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *