जालना : मुद्रा साहित्य सेवा संस्था आयोजित साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पुर्वसंध्येला शनिवारी ( दि.31) निमंत्रिताचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले. या कवी संमेलनात विविध कवींनी त्यांच्या बहारदार काव्याने रंगत आणली.
मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने शनिवारी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यानंतर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक रमेश देहडकर हे होते. प्रमुख वक्ते ललितलेखक प्रा.पंढरीनाथ सारके, प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम चित्रकार श्रीधर अंभोरे हे होते. याप्रसंगी प्रा.सारके यांनी ‘साहित्यसम्राट अण्णा भाऊचे साहित्य हे सर्वहरांच्या वेदना विस्तारांचे साहित्य होते’ कथा,कांदबरी,वगनाट्य,प्रवास वर्णन,लावणी,या संपूर्ण साहित्य प्रवासाची अतिशय चिंतन आशय संपन्नतेची मांडणी केली. तर ख्यातनाम चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊचे आत्मचरित्रात्मक कलावंताचे निखळ निर्लेप जगणे, वैभवी जगणे कुणी मांडलेचं नाही, श्री वैराळकरांनी काही अनुभव लिखित केले होते. पण ते वाचकासमोर आलेचं नाही.
तर डाॅ.बाबासाहेबांनी आपल्या धर्मपत्नीला लिहिले पत्र हा एक ललितलेखनाचा अप्रतीम दस्तावेज होता. पण तो ही काळाच्या ओघात नजरे आड केला. या प्रसंगी काही अज्ञात गोष्टीचा उलगडा अंभोरे यांनी केला. जयंती निमित्ताने कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवीवर्य सुनील लोणकर” दर्द” कवी यांच्या संपन्न हिंदी गझलेने कविसंमेलनाची सुरवात ‘दर्द’ या गझलेने झाली.
गावं मे पेड नही रहे,शहर में भी।
धुप से बचने के लिए, दरार पडी दिवार का साया होगा।
समकालीन वास्तवाचे भयावह परिस्थितीचे हे चिंतन काव्य लोणकर यांनी मांडले. शिवाजी तेलंग यांनी ‘जाब विचारा विकास निधीचा…
ही योग्य वेळ आली…
लोण्याचे गोळे खाऊनी,
बोके पसार झाली’
कवी मनिष पाटील यांची गझल
“दु:खीतांना या दुखाचा,युगायुगांचा शाप आहे.
हा आश्वत्थामी जिंदगीच्या,कपाळीचा घाव आहे”
कवी विनोद काळे यांनी उत्कट प्रेमभावना आपल्या सृजनशीलतेन सादर केली.
‘दो घडीचा तुझा सहवास
मज श्वास देऊन गेला
विराहातल्या कैक क्षणांना
तो विश्वास देऊन गेला’
‘होते हे उधाण आलेले,
वेदनेच्या या सागराला
भरती येता प्रीतीची,
दुःख सारे पिऊन गेला’
वात्रटिकाकार लक्ष्मीकांत दाभाडकर यांनी कवी
‘कविता करतो,बायको असून कवीच्या हदयी ही कोण असते?..
तुमच्या हदयात मी ठाण मांडून बसते”.
पाहते मी ती कविता कशी येते’.यावेळी कवी कैलास भाले यांनी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाची दाहकता मांडणाऱ्या दोन काव्य रचना सादर केल्या. ‘वाहतो तुझ्या समाधीवर, अंतःकरपुर्वक पृथ्वीमोलाची करूणा’. अध्यक्षीय समारोप जेष्ठ समाजसुधारक रमेश देहडकर म्हणाले की, आजच्या कवीने समकालीन राजकारणावर प्रखरपणे अभिव्यक्त झाले पाहिजे तीच खरी मुलनिवाशी कविता आहे. मुद्रा साहित्य सेवा संस्था ही सर्वाहांराचे विचारपीठ आहे. ही मायाळू गोताळ्याची मैफली आहे. याप्रसंगी रामा सुपारकर,नवनाथ लोखंडे, डाॅ.सुरेश गरूड, शांतीलाल बनसोडे, विठ्ठल वरपे याची उपस्थितीती होती तर कार्याक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन डाॅ.प्रभाकर शेळके यांनी केले.
Leave a Reply