ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांकरिता मा. सर्वोच्च न्यायालकडुन जालना जिल्हयाकरिता 35 लक्ष रुपये बाल न्याय निधी प्राप्त

January 28, 202214:29 PM 63 0 0

जालना  :- कोविड 19 मुळे एक पालक गमावलेल्या एकूण बालकांची संख्या 295 व दोन्ही पालक गमावलेल्या एकूण बालकांची संख्या 11 अशा एकूण बालकांची संख्या 306 असुन सदर बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल (SIR) करण्यात आला. या बालकांना 1 हजार 100 रुपये दरमहा प्रमाणे अनुदान अदा करण्यात येत आहे. कोविड व्यतिरिक्त 190 बालकांना बाल कल्याण समितीने बालसंगोपन योजना मंजुर करण्यात आली आहे. सदर बालकांना 1 हजार 100 रुपये दरमहा प्रमाणे अनुदान अदा करण्यात आले आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभाग यांच्या मार्फत कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचे सर्वेक्षण करुन त्यांना विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या.
या बैठकीसाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती.आर.एन.चिमंद्रे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर.बी.पारवेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती.एस.डी.लोंढे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक बी.एस.रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.विवेक खतगावकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ.मनोहर बन्सवाल, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग सुशिल उचले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अमीत घवले, मुख्याधिकारी मा.श्री.नितीन नार्वेकर, महिला आर्थिक विकास महामंडळ धनंजय कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, चाईल्ड लाईनचे माधव हिवाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, सचिन चव्हाण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.वाघमारे, श्री.नागरे, श्री.बडे, श्री.साळवे, श्रीमती.चौहान, श्री.डिघुळे, श्री.कोळेकर यांची उपस्थिती होती.
Pmcaresforchildren.in या संकेतस्थळावर दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 11 बालकांची नोंदणी करण्यात आली आहे. National Commission for Protection of Child Rights (NCPCR) – बाल स्वराज पोर्टल वर 306 मुलांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
शासकिय निरीक्षणगृह/बालगृह मधील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच शासकीय महिला राज्यगृहातील 15 ते 18 वयोगटातील मुलींच्या लसीकरणाबाबतची माहिती मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमतीआर.एन.चिमंद्रे यांनी दिली.
कोविड 19 मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी जालना जिल्हयाकरिता 35 लक्ष रु. एवढा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधीच्या विनियोगाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाकडुन कार्यपध्दती ठरवुन देण्यात आलेली आहे. या रकमेचा विनियोग कोविड-19 संसर्गामुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशांसाठी करण्यात येईल. उपरोक्त उद्देशांपैकी एका बालकास एक वा अधिक कारणांसाठी सहाय्य देता येईल तथापि त्याशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी किंवा सरसकटपणे लाभाची रक्कम वितरीत करता येणार नाही. सदर आर्थिक सहाय्याची कमाल मर्यादा 10 हजार रुपये इतकी असेल व ते एका बालकास एकच वेळ देता येईल.
तरी गरजु बालकांनी शैक्षणिक मदतीकरिता आवश्यक कागदपत्रासहित अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे करावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृती दल यांनी केले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल सुमोटो रिट याचिका 6/2020 नुसार मा.आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या पत्रान्वये जालना जिल्हयातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये एकूण 103 मुले आढळुन आली आहे. सदर मुलांची नोंदणी NCPCR – CISS पोर्टलवर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना रस्त्यावर राहणारी मुले आढळुन आल्यास चाईल्ड लाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना कळवावे असे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांनी दिले.
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकिय योजनेचा लाभ मिळवुन देण्या करिता मिशन वात्सल्य समितीची दर महिन्याला नियमित बैठका घेण्यात याव्यात. तसेच प्राधान्यक्रमाने वारस नोंदी, शिधा पत्रिका, घरकुलाचा लाभ देण्याकरिता व इतर योजनांचा लाभ देण्याकरिता प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशा सुचना सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आल्या.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना कृषी विभागाअंतर्गत विविध योजनांचा जसे की, वैयक्तिक लाभाच्या योजना, पोखरा अंतर्गत इतर योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *