ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दोन बारवर धाड; महिला, पुरुषांसह 71 जणांवर गुन्हे दाखल

September 13, 202113:45 PM 12 0 0

नवी मुंबई: कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत लपूनछपून बार सुरू करणाऱ्या तळोजा, पनवेलमधील दोन बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तळोजा येथील चंद्रविलास आणि पनवेलमधील टोपाझ बारवर पोलिसांनी कारवाई करून 71 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.


पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई करत एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या बार मालकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. आधी पनवेल तालुक्यातील साई निधी टोपाझ बारवर कारवाई केल्यानंतर तळोजा येथील चंद्रविलास बारवर आणि नंतर पनवेलमधील टोपाझ बारवर पोलिसांनी कारवाई करत ग्राहक आणि होटेल स्टाफवर गुन्हे दाखल केले आहेत.
बारमालकांना नोटिसा
12 सप्टेंबरच्या मध्यरात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून कारवाई ही करण्यात आली. तसेच बारमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या. कोरोना नियमांचे उल्लंघन करत लपूनछपून हे बार सुरू होते. या प्रकरणी तब्बल 39 जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पनवेल तालुक्यातील कोन येथे साई निधी टोपाझ बारवर याच पथकाने कारवाई केली होती.
14 महिलांवरही कारवाई
10 सप्टेंबर रोजी टोपाझ बार विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी पुन्हा लपून सुरू केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी साई निधी टोपाझ बार सुरू असल्याचे निदर्शनास आले. शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत हा बार सुरू होता. त्यामुळे याप्रकरणी 14 महिला वेटर, 9 ग्राहक आणि 9 पुरुष वेटर मॅनेजरसह 32 जणांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बार बंद होता, पण
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बारच्या ठिकाणी पोचलो. बार बाहेरून बंद होता. मात्र, आतून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने हा बार सुरू असल्याचं निदर्शनास आले. आम्ही नियमानुसार कारवाई करत तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे, असं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांनी सांगितलं.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *