ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धरती वाचविण्यासाठी वनसंपदा संवर्धन गरजेचे : ॲड संजय देशपांडे रोटरी मिडटाउन तर्फे जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण

September 3, 202114:19 PM 55 0 0

जालना ( प्रतिनिधी) : मानवाने प्रगतीचे टप्पे गाठत असताना पर्यावरणाचा बेसुमार ऱ्हास केला. परिणामी दिवसेंदिवस होत असलेली तापमान वाढ, हुलकावणी देत असलेला पाऊस,अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल साधत धरती वाचविण्यासाठी वनसंपदा संर्वधन करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय देशपांडे यांनी आज येथे बोलताना केले.

रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन तर्फे गुरूवारी ( ता. 02) मियामाकी प्रकल्पांतर्गत जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ॲड. संजय देशपांडे बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, वकील संघाच्या सचिव ॲड . शारजा शेख,रोटरी च्या उपप्रांतपाल रो. डॉ. सुमित्रा गादीया, न्या. ए. एस. राजंदेकर,न्या. ए. एल. टिकले , न्या.एन .आर.प्रधान, न्या. व्ही.जी .सूर्यवंशी, न्या.एस.डी.भगत ,न्या. एन .व्ही.विरेश्वर, न्या. एस.एस.पल्लोड, न्या. एस. जी देशमुख,न्या.माधुरी कुलकर्णी , न्या. एच .ए.अन्सारी , न्या.एम .वाय.डोईफोडे , न्या.एस.टी.चिकणे, न्या. कांचन झंवर,न्या.एम. बी. ओझा, न्या. एस. व्ही.चक्कर, न्या.एन .ए.वानखेडे, न्या.आर. एस .अडकिने, रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी यांची उपस्थिती होती.

ॲड संजय देशपांडे यांनी रोटरी मिडटाउन ने पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केलेल्या मियामाकी प्रकल्पास न्यायालय परिसरात केलेल्या वृक्षांची वकील संघामार्फत निगा राखली जाईल. असे सांगितले.
प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी वृक्षारोपणा सारखे जीवनदायी उपक्रम राबवले पाहिजे. असे नमूद केले. सुञसंचालन ॲड.अरविंद मुरमे यांनी केले तर सचिव रो .प्रशांत बागडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास
वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत, सहसचिव ॲड. जगदीश मदन, ॲड.अश्विनी धन्नावत, ॲड.आनंद झा, ॲड.लक्ष्मण उढाण, ॲड. सुरेश कुलकर्णी, ॲड.अमोल मोकळे, ॲड.प्रतापसिंह परिहार, ॲड.रोहीत बनवसकर,
ॲड.निवृती मदन, यांच्या सह विधीज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.

पंचवीस हजार वृक्ष लागवड करणार : रो.ॲड. महेश धन्नावत

कोवीड च्या दुसऱ्या लाटेत नैसर्गिक प्राणवायूचे महत्त्व कळून चुकले आहे. रोटरी मिडटाउन ने वृक्ष लागवड व जतनासाठी पुढाकार घेतला असून मियामाकी प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ मुंबई एलिमेंट च्या निलीमा झुनझुनवाला यांच्या सहकार्याने पंचवीस हजार वृक्ष लागवड केली जाईल. अशी माहिती रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत यांनी यावेळी बोलताना दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *