जालना, दि. १०(प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवठाकरे यांच्या आदेशावरुन राज्यात शिवसेना पक्ष संघटनेची बांधणी मजबुतकरण्यासाठी १२ ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क मोहिम राबविण्याचे आदेशदेण्यात आले. या आदेशाप्रमाणे आज १० जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्षयांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाNयांची बैठक जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, माजी आमदार संतोष सांबरेयांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिमराबविण्यासंदर्भातील सविस्तर चर्चा करण्यात आली व दौNयाचे नियोजन करण्यातआले.
जालना जिल्ह्यात येत्या १२ जुलैपासून माजीमंत्री अर्जुनराव खोतकर,सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, उपनेते लक्ष्मणराव वडले, आमदार संतोषसांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीतजालना, बदनापूर, भोकरदन,जाफराबाद या तालुक्यातील प्रत्येक पंचायत समितीगण निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुखभास्करराव अंबेकर यांनी दिली. या शिवसंपर्क मोहिमेदरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी,कोरोना संसर्ग आढावा,नवीन मतदार नोंदणी, गाव तेथे शाखा,जेष्ठ शिवसैनिकांचा संपर्क नगर पंचायती, नगर पालिका क्षेत्रात प्रभाग निहाय आढावा, संघटनात्मक बाबींचा आढावा, शासकीय योजना तसेच शेतकरी कर्जमुक्ती योजने संदर्भात शेतकNयांशी संवाद व ग्रामीण भागातील समस्या यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या दौNयात कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन अतिशय नेटक्या पध्दतीने बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकांना तालुकाप्रमुख,उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना, दलित आघाडी यांसह पंचायत समिती, जिप सदस्य आदी पदाधिकाNयांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील या सर्व बैठकांना माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांची उपस्थिती राहणार आहे. १२ व १४ जुलै रोजी बदनापूर तालुका, १३ व १५ जुलै जालना तालुका, १६ व १७ जुलैला भोकरदन तालुका तर १८ जुलैला जाफराबाद तालुक्यातील पंचायत गण निहाय दौNयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे. या बैठकीस किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, भगवान कदम, परमेश्वर जगताप, मनिष श्रीवास्तव, वैâलास पुुंगळे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, हरिभाऊ पोहेकर, नवनाथ दौड, बजरंग बोरसे, महेश पुरोहित, वुंâडलिक मुठ्ठे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply