जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवरील नाव्हा गावालगत वंâटेनर घरात घुसून झालेल्या दुर्घटनेत शेख कुटूंबियांच्या दोन मुली मृत्यमुखी पडल्या. या शेख परिवाराचे आज शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्यांच्या धारकल्याण या गावी जावून कुटूंबियांची भेट घेवून त्यांना धीर देत सांत्वन केले.
दरम्यान जालना तालुक्यातील नाव्हा शिवारात आजोळी आलेल्या शाहीन व सुयमा या दोन मुली रस्त्यालगत असलेल्या घरासमोरील अंगणात खेळत होत्या.रस्त्यावरुन भरधाव जाणाNया वंâटेनर चालकाचा ताबा सुटून वंâटेनर दोन मुलींना चिरडत घरात घुसले. या अत्यंत दुर्देवी घटनेत दोन्ही बहिणी जागेवरच ठार झाल्या तर आई जखमी झाली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या कुटूंबियांचे सांत्वन शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर त्यांच्या मुळ धारकल्याण गावी जावून शेख कुटूंबियांची भेट घेतली व त्यांना धीर देत सांत्वन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, बाजार समितीचे सदस्य तुळशीदास काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply