ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुळे आण्णा फाऊंडेशन तर्फे सदर बाजार पोलिस ठाण्याला गेट भेट माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हास्ते उदघाटन

April 24, 202112:54 PM 7 0 0

जालना (प्रतिनिधी)  दिनांक 23 रोजी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे रमेश अण्णा मुळे यांनी, मुळे अण्णा फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने सदर बाजार पोलिस स्टेशन येथे पोलीस स्टेशनला मुख्य प्रवेश द्वाराला गेट दिले.

यावेळी रमेश मुळे यांनी आता पर्यंत एका वर्षात कोरोना काळात जालना, औरंगाबाद, बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनला कोरोना योध्दा म्हणून पोलिसांना सॅनिटायझर, मास इत्यादीचे वाटप केले. कोरोना योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशारी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुळे यांचा सन्मान केला व तिन्ही जिल्ह्यातील गोर गरिबांना त्यांच्या मुळे फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत साडेतीन कोटीचे अन्न धान्य वाटप केले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मुळे आण्णा फाऊंडेशनचे रमेश अण्णा मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, पोलीस नाईक समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, सक्रुदिन तडवी, प्रदीप भंडारी, बंटी ओहोळ, रमेश फुसे आदिची उपस्थित होती.

सदर बाजार पोलिस ठाण्याला गेट नसल्यामुळे गेट भेट दिले-रमेश आण्णा मुळे
सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हाद्दीत हल्ला झाला तर गर्दी होऊ नये सेवा छोटी आसु मोठी असू, संत गाडगे महाराज सारखी आहे. बुलढाणा जिल्हातील महेकर पोलिस ठाणे, सदर बाजार पोलिस ठाणे येथे गेट भेट दिले आहेत. जालना नगर परिषद कर्माचारी यांना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर याच्या हस्ते अन्नधान्य वाटप करणार असल्याचे मुळे फांऊडेशनचे रमेश आण्णा मुळे यांनी बोलतांना सागितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *