सातारा ,प्रतिनिधी (विदया निकाळजे) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
शुक्रवारी रात्री नऊ वाजता सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात देशमुख यांनी शेवटचा श्वास
सोडला. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सलग अकरा वेळा आमदार म्हणून निवडून यायचा विक्रम आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावे आहे .
अत्यंत साधी राहणी उच्च विचार असे आमदार गणपतराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व होते. आमदार देशमुख यांनी 54 वर्ष सांगोला मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
Leave a Reply