उरण (संगिता पवार ) उरण तालुक्यातील चिरनेर येथील कृष्णा आनंत म्हात्रे यांचा गुरांचा वाडा मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता आलेल्या पावसाबरोबर कोसळला असून गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि तिचे वासरू थोडक्यात बचावले असून यात बांधलेल्या जनावरांची कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र गोठ्यातील गुरांसाठी भरलेला 1000 पेंढा संपूर्ण भिजून गेला असून गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
तर जळण्यासाठी भरलेल्या फाट्याही भिजून गेल्या आहेत याशिवाय कौले, वासे व वाड्याच्या इतर लाकडी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिरनेर सजाचे तलाठी यांच्या सांगण्यावरून कोतवाल नथुराम कातकरी यांनी कोसळल्या वाड्याची पाहणी करुन पंचनामा करून तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे सदर कोसळलेल्या वाड्याची नुकसानभरपाई कृष्णा म्हात्रे यांना मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून तहसील कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे
Leave a Reply