ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

साडेचार कोटींचा साठा जप्त ;  ४६ हजार गोणी ताब्यात महसूल विभागाची कारवाई

August 3, 202212:48 PM 16 0 0

उरण (संगिता पवार ) : देशाच्या सीमेवर दिवसरात्र शत्रूबरोबर लढणाऱ्या लष्करी जवानांच्या ताटातील घास हडप करून तो परदेशात पळवण्याचा डाव महसूल विभाग आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. देशभरातील लष्करी जवानांना वितरित करण्यासाठी २३ हजार २९३ क्विंटल गहू घेण्यात आला होता. या गव्हाच्या ४६ हजार ७८७ गोणी चोरट्या मार्गाने परदेशात पाठवण्यासाठी जासई येथील इनलाईन वेअरहाऊसमध्ये साठवण्यात आल्या होत्या. मात्र या कटाचा सुगावा लागल्यानंतर महसूल विभाग आणि उरण पोलिसांनी इनलाईनच्या गोदामावर छापा मारून हा गहू जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशभरात सार्वजनिक आणि लष्करासाठी वितरण करण्यात येणारा लाखो टन गव्हाचा साठा चोरट्या मार्गाने परदेशात पाठवला जाणार आहे अधि माहिती नवी मुंबई पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली त्या नुसार पोलिसांनी उरण परिसरातील गोदामांची झाडाझडती सुरू केली होती. जासई येथील इनलाईन वेअरहाऊसच्या गोदामावर शनिवारी छापा टाकला गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामातील मालाची आणि कागदपत्रांची कसून तपासणी केलीत्यावेळी हि धक्कादायक बाब उघडकीस आली. या लाखो टन गव्हाचा साठा चोरट्या मार्गाने टाकला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस परदेशात पाठवला जाणार आहे, अशी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कसून तपासणी केली. त्यावेळी ही गव्हाचा साठा परदेशात निर्यात करण्यात येणार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी इनलाईन वेअरहाऊसवर छापा टाकला. यावेळी विले आणि कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक उणिवा, अनियमिता आढळून आली आहे. या गोदामात देशभरातील विविध राज्यांतील सरकारी नावे असलेल्या धान्याच्या हजारो रिकाम्या गोणींची बंडलही आढळून आली आहेत.

मालक, व्यवस्थापकावर गुन्हा
गोदामात अवैधरीत्या ५० किलोच्या ४६ हजार ७८७ गव्हाच्या गोणी ठेवण्यात आल्या असल्याचे तपासणीत आढळून आले. या गव्हाचे वजन २३ लाख २९ हजार ३५० किलो इतके असून किंमत चार कोटी ६७ लाख ८७ हजार इतकी आहे. याप्रकरणी इनलाईन वेअरहाऊस गोदामाचे मालक प्रवीण अंचल आणि व्यवस्थापक सुमन कुमार या दोघांविरुद्ध उरण पुरवठा निरीक्षक सोमनिंगा बिराजदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गोदामात गव्हाच्या साठवण्यात आलेल्या सुमारे ४६ हजार गोणी लष्कराच्या जवानांसाठी खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या चोरट्या मार्गाने परदेशात पाठवण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *